Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देवेंद्रजींच्या संघर्षाचा विजय, ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आनंद; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्यासोबतच खूप जबाबदारीही त्यांच्यावर आलेली आहे. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.

देवेंद्रजींच्या मेहनतीला यश मिळाल्याचा मला आनंद आहे. महायुती आता एकत्रित आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल चालू केलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

बरेच कामे त्यांना काम करायची

अमृता फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे जीवन संघर्षमय राहिलेले आहे. त्यांनी मोठा संघर्षाचा काळा पाहिलेला आहे. त्यांनी काही करायचे ठरवले, तर ते करून दाखवतात. जिद्द आणि चिकाटीमुळे देवेंद्रजी आज या ठिकाणी आहे. देवेंद्रजींना महाराष्ट्रासाठी बरीच कामे करायची आहे. आपल्या सर्वांना त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Maharashtra Assembly Election 2024

जनतेच्या आणि स्व विश्वासामुळे ते पुन्हा आले

देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरून विरोधकांनी टीका केली होती. यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केले. आपल्याला काही प्राप्त करायचे तेव्हा आपल्याला अर्जुनासारखे एकच लक्ष असले पाहिजे. ते पुन्हा येतील याबाबत लोकांना आणि देवेंद्रजींना विश्वास होता. देवेंद्रजी महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील, ते इतर कुणीही करू शकणार नाही. या विश्वासामुळे ते पुन्हा आलेले आहेत, असे अमृता म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना उत्तम योजना

लाडकी बहीण योजना एक चांगला प्रकल्प आहे. साऱ्या बहिणी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीसोबत जोडल्या गेल्या. संसदेत आणि राजकारणात महिलांचे प्रमाण अधिक असावे यासाठी बिल मंजूर झाले आहे, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाबाबत विचार केला नव्हता

23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मी देवेंद्रजींना मुख्यमंत्री पद भेटेल की नाही याबाबत विचार केला नव्हता. त्यांनी आपल्या कामाचे चीज करून दाखवले. पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणतेही पद मिळाले असते, तरी त्यांनी लोकसेवाच केली असती, असे अमृता फडणवीस म्हणाल्यात.

उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

2019 मध्ये भाजपसोबत धोका झाला होता तेव्हा पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की जद में हूँ मौसम जरा बदलने दे, असे ट्वीट केले होते. आज तो मौसम बदलला आहे. आम्ही त्या परिस्थितीतूनही अव्वल क्रमांकाने बाहेर पडलो आहोत, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+