महायुतीचा रात्रीस खेळ चाले! दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू, एकनाथ शिंदे म्हणाले- लाडका भाऊ दाखल झाला
Mahayuti Leader Meeting with Amit Shaha : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे. कारण, देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत महायुतीचा रात्रीस खेळ चालू झालेला आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे काही वेळांपूर्वीच दिल्लीत दाखल झालेले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू असणार आहे.
दिल्ली विमानतळावर शिंदे काय म्हणाले?
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमातळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे शिवसेनेच्या खासदारांनी स्वागत केले. त्यानंतर बैठकीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व निर्णय होणार आहे. मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून दिल्लीत दाखल झालेलो आहे. तर माझी व माझ्या पक्षाची भूमिका मी कालच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

फडणवीस-पवार यांच्यात बैठक?
महाराष्ट्रातील नवा मुख्यमंत्री कधीही जाहीर होऊ शकतो. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा अमित शाह यांच्या घरी पोहोचले आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित झाले आहेत.
#WATCH | Delhi: NCP chief Ajit Pawar arrives at the residence of HM Amit Shah. pic.twitter.com/e72bBuAkqG
— ANI (@ANI) November 28, 2024
बैठकीपूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठकही झाली. भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याला मी पाठिंबा देईन, असे शिंदे यांनी आधीच सांगितले आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याच्या बाहेर फडणवीस यांना महाराष्ट्राचे सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर फडणवीस शपथ घेताना दिसून येत आहेत.
#WATCH | Maharashtra's caretaker CM and Shiv Sena chief Eknath Shinde arrives at the residence of Union Home Minister Amit Shah, in Delhi. pic.twitter.com/lWcHnFLd82
— ANI (@ANI) November 28, 2024
अमोल मिटकरींचे सूचक ट्विट?
नवी दिल्लीत सद्या महाराष्ट्राचा महानायक कोण असेल, यावर सखोल चर्चा सुरू झालेली आहे. तत्पूर्वी अजित पवार व फडणवीस यांची देखील बैठक झाली होती. ही घडामोड घडत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, जंगली शेर फिरसे वापस आयेगा, असे म्हणत संकेत दिले आहेत.
#WATCH | Delhi: BJP leader Devendra Fadnavis arrives at the residence of HM Amit Shah. pic.twitter.com/PE53A9hszq
— ANI (@ANI) November 28, 2024
अजित पवारांनी EVM वरील विरोधकांचे दावे फेटाळले
नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विरोधकांनी ईव्हीएमवर केलेले आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. ते म्हणाले, विरोधकांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. त्यांना लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या, तेव्हा त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगले होते. आता विधानसभा निवडणुकीत निकाल वेगळे लागले म्हणून ते ईव्हीएमला दोष देत आहेत. ते पंजाब, कर्नाटक व तेलंगणासारख्या अनेक राज्यांत ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानामुळेच सत्तेत आलेत.












Click it and Unblock the Notifications