जेव्हा जेव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं - अमित शहांचा मविआवर घणाघात
"जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा मराठा समजाला आरक्षण मिळते. पण जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण गायब होते असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला.
पुणे येथे भाजपच्या राज्य अधिवेशनाचा समारोपीय भाषणात अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

काँग्रेसवाले अपप्रचार करत आहेत
अमित शहा म्हणाले, काँग्रेसवाले अपप्रचार करीत आहेत. ५८ वर्ष काँग्रेसचे शासन होते, काँग्रेसने गरीबांसाठी काय केले. दहा वर्षात आम्ही गरीबांचे कल्याण केले. खोटे नॅरेटीव्ह सध्या विरोधक करीत आहेत त्यांच्या खोट्या नॅरेटीव्हवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात निवडणुका आहेत. शरद पवार नवीन खोटे नॅरेटीव्ह सेट करीत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार येते, तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते. जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण गायब होते.
मविआ सरकार आल्यास मराठा आरक्षण जाणार
अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण दिले तेव्हा भाजपचे सरकार होते आम्ही मराठ्यांना आरक्षण दिले पण नंतर शरद पवारांची सरकार आली तेव्हा आरक्षण गेले. पुन्हा आता आमचे सरकार आहे, आम्ही आरक्षण देण्याचे काम करत आहोत. जर शरद पवारांचे पुन्हा सरकार आले तर आरक्षण जाईल. त्यामुळे आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी भाजपचे सरकार राज्यात आणावे.
ही लढाईची वेळ
"डोके पकडून बसायचे नाही तर लढाईची वेळ आहे. आपल्याला सारी कसर भरुन काढायची असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक मोठ्या बहुमताने आम्ही जिंकणार आहोत. असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
..पुन्हा कमळ फुलले
अमित शहा म्हणाले, देशात भाजपच्या विस्तृत कार्यकारणीचे आयोजन होत आहे, महाराष्ट्रात २०२४ मध्ये पुन्हा कमळाचे सरकार अर्थात युती सरकार आणायचे आहे, त्यासाठी विस्तृत कार्यकारणी आपण गठीत करीत आहोत. देशात तिसऱ्यांदा शपथ सलगरित्या पंतप्रधान बनण्याची कामगिरी पंतप्रधानांनी केली.
महाराष्ट्राची निवडणूक जिंकायचीच
अमित शहा म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक आपल्याला मोठ्या बहुमताने जिंकायची आहे. आपल्या विरोधी पक्षाने नॅरेटीव्ह पोहचवण्याचे काम केले. भाजपने देशात २४० जागा मिळवल्या, पण देशातील सर्व पक्ष एकत्र येऊन बनलेली इंडीया आघाडी भाजपएवढ्याही जागा मिळवू शकली नाही.
महाराष्ट्रात सर्वात मोठा विजय मिळणार
अमित शहा म्हणाले, डोके पकडून बसायचे नाही, लढाई जवळ आली आहे, आपल्याला सारी कसर भरुन काढायची असून विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आज आम्ही संकल्प केला असून आम्ही खुर्ची महत्वाची नाही तर विचारधारेशी बांधिल आहोत.
अमित शहा म्हणाले, दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवून काश्मीरला या कलमापासून मुक्त केले. राममंदीरही आमच्याच भाजप सरकारने केले. दहा वर्षात खटला जिंकून मंदिरही बांधल्याचे अमित शहा म्हणाले.
भाजप ३० वर्ष सत्तेत राहील
अमित शहा म्हणाले, तीस वर्षांसाठी भाजप या देशात सत्तेत राहील. महान भारताची रचना फक्त भाजपच करु शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्तवात सर्जिकल स्ट्राईक केला. गरीबाचे कल्याण फक्त भाजपच करु शकतो त्याशिवाय कुणी करु शकत नाही.












Click it and Unblock the Notifications