मोठी बातमी! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा मांडत दिली चर्चेला हवा
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. तेथे पत्रकारांनी अजित पवारांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले. शिवाय धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्या भेटीबाबतही विचारले. या सगळ्या प्रश्नांनंतर अजित पवारांनी दिलेले उत्तर ऐकूण अनेकांचा भुवया उंचावल्या. कारण मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत यापूर्वी अजित पवार काय धनंजय मुंडे यांना पाठीशी घालताना दिसले. मात्र आज नाशिकमध्ये अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नैतीक दडपण आणलंय का, हा प्रश्न पडला आहे.

नेमके काय झाले?
अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तेथील पत्रकारांनी धनजंय मुंडे यांची सुरेश धस यांची घेतलेली भेट, धनंजय मुंडे यांचा राजीनामा तसेच फरार कृष्णा आंधळे, असे प्रश्न अजित पवार यांना विचारले. त्यावर अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिले. ते म्हणाले, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला होता. आता या सगळ्या प्रकरणात राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे. अजित पवारांनी असे उत्तर देऊन धनंजय मुंडे यांच्यावर नैतिकतेचे कारण सांगून दडपण आणले आहे, असे बोलले जात आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार पुढे म्हणाले, पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसेल. पण २०१०-११ ला आरोप झाल्यावर मी लगेच राजीनामा दिला होता. माझ्यावर झालेले आरोप माझ्या सद्वविवेकबुद्धीला पटले नव्हते. शेवटी ज्याचा- त्याचा निर्णय, ज्याने त्याने घ्यायचा असतो. चौकशीत जर त्यांच्यावर संशयाची सुई गेली तर मी कारवाई करेन, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications