"..तर खुप मोठी किंमत मोजावी लागते", वाल्मिक कराड प्रकरणानंतर अजितदादा सावध, आमदार,नेत्यांना सुनावले
Ajit Pawar's advice to leaders : संतोष देशमुख प्रकरणाी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक पाहता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्या धर्तीवर अजित दादांनी आपले आजी माजी आमदार, नेत्यांना आता ताकही फुंकून पिण्याचाच एकप्रकारे आज बीड जिल्ह्यातील आपल्या दौऱ्यात सल्ला दिला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सध्या समाजामध्ये जाती-जातीमध्ये निर्माण झालेला दुरावा संपवण्याचे काम सर्वांना मिळून एकत्र येऊन करावे लागणार आहे. पक्षांमध्ये घेणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे मात्र कार्यकर्त्यांची निवड करताना त्यांचे रेकॉर्ड देखील तपासणे गरजचे आहे असे अजित पवार म्हणाले, तसेच आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी अशा प्रकारचे खडे बोल बोलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजी - माजी, आमदार, जिल्हाध्यक्ष प्रमुख नेत्यांना सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष बांधणी आणि संघटन करण्यासाठी बुधवारी आज 2 एप्रील 2025 रोजी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये युवा संवाद मेळावा घेतला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची काम करण्याची पद्धत आणि मराठवाड्यातील लोकांची काम करण्याची पद्धत यामध्ये फार मोठी तफावत आहे. आपण ज्या प्रकारच्या सवयी लावून देतो तसाच घडत असतं असं म्हणत ते म्हणाले मला बीडमध्ये आज आल्यावर अनेकांनी निवेदने दिली काहींनी दहा-दहा लाख रुपयांच्या निधी देण्याची मागणी केली यावर माझी स्पष्ट अशी भूमिका आहे ती 15 लाखाची ई टेंडर काढणार आहे दहा दहा लाखांचा निधी देणार नाही. अधिकाऱ्यांनी त्यांचे काम चोकवण करणे गरजेचे आहे प्रत्येकाचा मी आढावा घेणार आहे, लोकांच्या अडचणी जाणून घेऊन चर्चा करून प्रश्न सोडवा दिरंगाई खपवन घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
"दादागिरी करणाऱ्यांवर मकोका लावा"
बीड जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हा गैरप्रकार होत आहे अशा प्रकारचे प्रकरण देखील समोर आलेले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याचा गैरवापर झाला आणि चौकशीमध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असतील याची देखील खबरदारी ग्रामीण भागातील सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या गैरप्रकारात कोणी अडकलं तर मी त्यांना सोडवायला येणार नाही. आणि दादागिरी करणाऱ्यांवर मकोका लावण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जनता राजकारणाशी संबंध नाही त्यांचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कोणाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असे ही उपमुख्यमंत्री पवार यांनी खडसावले.
मी स्वप्न दाखवत नाही...
अजित पवार म्हणाले, मी स्वप्न दाखवत नाही तर प्रत्यक्षात काम करत असतो. माझं काम म्हणजे 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारण असं आहे बीड जिल्ह्यात मात्र उलटी परिस्थिती आहे 80 टक्के राजकारण केलं जातं 20 टक्के समाजकारण हे बदलायला पाहिजे.झालं गेलं ते सगळं विसरून जा नवी पहाट नवीन सूर्य पहा आणि चांगल्या कामाने स्वतःचा आणि जिल्ह्याचा विकास करून घ्या हीच संधी आहे ओळखून घ्या वडीलधाऱ्यांनी साथ दिली पाहिजे महिला आणि लाडक्या बहिणीने देखील मदत केली पाहिजे, असे ही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार अशी अपेक्षा व्यक्त केली.
बीडची रेल्वे अन् जादूची कांडी..!
बीड रेल्वे चा उशीर होण्यास कुणीतरी नैतिक जबाबदारी घेणे गरजेचे आहेत कुणीतरी येऊन जादूची कांडी फिरवून काम होईल असं नसतं असाही टोला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील नेत्यांना लगावला.












Click it and Unblock the Notifications