तानाजी सांवतांचे राष्ट्रवादीबाबत 'ते' वादग्रस्त विधान; अजित पवार म्हणाले- ...तर माझ्या अंगाला..
ajit pawar replied on Tanaji Sawant's criticism of Nationalist Congress Party :विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी आणि जागावाटपाबाबत बैठकांचा धडाका सध्या महायुती आणि आघाडीमध्ये सुरु आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा विधानसभेचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे मंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसबाबत (अजित पवार गट) वादग्रस्त विधान केले होते. मात्र यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?
"राष्ट्रवादीबरोबर आपलं कधीही पटलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात", असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी नुकतेच केले होते. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) काही नेत्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचाही इशारा दिला होता. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले की, "मला बाकीचं काहीही बोलायचं नाही. मला माझ्यापुरतं बोला. याने असं केलं किंवा त्यांने असं केलं, याबाबत मला काहीही देणंघेणं नाही.
मी सुरवातीला ठरवलेलं आहे की, कोणावरही टीका करायचं नाही. मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला छिद्र पडत नाहीत. माझं काम सुरु आहे. मी कामाचा माणूस आहे. मी लोकांचे कामं करतो. आज चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे."
सावंत यांचं वक्तव्य अन् राजकीय कलगीतुरा
राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीसोबतच्या महायुतीवर सडकून टीका केलीय. 'आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आयुष्यात आपले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कधीही पटलेले नाही. आज जरी राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे,' असं सावंत यांचं वक्तव्य होतं. आता या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावंत यांना लक्ष्य केलयं.
'तानाजी सावंत नाव असलेले महाराष्ट्रात बरेच आहेत. तानाजी सावंत यांना विचारून आम्ही मंत्रिमंडळात सामील झालेलो नाही. त्यांना आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. लोककल्याणकारी योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहेत. पण, कोणी मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला आवरण्याची गरज असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय.यावरुन राजकारणात कलगीतुरा रंगत आहे.












Click it and Unblock the Notifications