Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोकाटेंची गच्छंती अटळ! कितीदा चुकायचे अन् किती वेळ माफ करायचे? अजित दादांचा हा सवाल कुणाला? वाचा

Agriculture Minister Manikrao Kokate may resign today : माणिकराव कोकाटेंचे विधानसभेतील रमी पुराण आणि सरकार भिकारी आहे ही 'सिंहगर्जना'आज त्यांच्यावर उलटण्याची शक्यता असून त्यांची गच्छंती अटळ आहे असे बोलले जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी रोखठोक सवाल करुन कोकाटेंची गच्छंती अटळ असल्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात सध्या महायुती सरकारमधील काही मंत्र्‍यांना घरी जावे लागणार आहे असे भाकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याआधीच कृषिमंत्री माणिकराव कोकोटे हे विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ जारी झाला तो व्हिडिओ कुणी काढला याची विधानसभेची समिती चौकशी करत आहे, त्यादरम्यान आता माणिकराव कोकोटेंची गच्छंती होऊ शकते.

Agriculture Minister Manikrao Kokate

राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यातील जनता आणि विरोधकांचा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी प्रचंड दबाव आहे आणि हा दबाव झुगारुन माणिकराव कोकाटेंना अभय देणे हे योग्य ठरणार नाही असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बनला आहे, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारला भिकारी म्हणत घरचा आहेर दिला त्यामुळे आता महायुतीतील इतर पक्षही माणिकराव कोकाटेंच्या विधानावर आणि कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटेंच्या वक्तव्यावर नाराजी केली होती.

Take a Poll

सतत चुका, कितीदा माफ करायचे?- अजित पवार

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाशिकच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात भेट घेतली आणि माणिकराव कोकाटेंना समर्थन देत राजीनामा घेऊ नका अशी मागणी केली. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना "आपण किती वेळ चुकाकरणार आणि किती वेळा माफ करायचं " असा सवाल केला. म्हणजेच आता कोकाटेंच्या राजीनाम्याची औपचारिकताच राहीली असे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्या बोलण्यातून जाणवले आहेत.

अजित पवारांकडे माणिकराव कोकाटेंची दिलगिरी

आज सकाळी अजित पवारांशी कॅबिनेट बैठकीपुर्वी माणिकराव कोकाटेंची भेट झाली. त्यावेळी झालेल्या प्रकाराबद्दल कोकाटे यांनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली आणि यापुढे अशा गोष्टी घडणार नसल्याचे त्यांनी अजित पवारांना आश्वासन दिले असे सुत्रांच्या हवाल्यानुसार, एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत, त्या धर्तीवर विरोधकांनीही विधानसभेतील कोकाटे रमी खेळत असल्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे, अशा स्थितीत कोकाटेंना पदावर कायम ठेवणे म्हणजे जनतेचा रोष वाढू शकतो आणि निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो असेही पक्षात एक मतप्रवाह बनला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+