लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिला होणार अपात्र, वाचा तुम्ही यात आहात का..?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री आदीती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत काही तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहिर केला.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
कोणत्या अर्जांची पडताळणी होणार?
सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, "तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील. तसेच कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही अपात्र ठरतील. या दोन प्रमुख अटींशिवाय आंतरराज्य विवाह केलेल्या महिलाही या योजनेस पात्र ठरणार नाहीत, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरतील, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
नवे बारा लाख लाभार्थी
आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे ही योजना अशीच सुरु राहणार आहे. एप्रिल महिन्यात या योजनेतून २१०० रुपये मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications