कल्याण नगर महामार्गावर भरधाव वेगात येणा-या ट्रकने अत्यंविधीवरुन परतणा-यांना चिरडलं, 5 ठार

Accident News : कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणा-या ट्रकने रस्ता सोडून अंत्यविधीवरुन परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला. या अपघातात 5 जण ठार झाल्याची माहिती आहे तर 10 जण गंभीर जखमी आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.

Accident News

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा ही समावेश आहे. जुन्नर तालुक्यात गुळंचवाडी शिवारात ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.या अपघातानंतर गावकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

गावक-यांची आक्रमक भूमिका

जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळूंचवाडी येथील एका व्यक्तीच्या अंत्यविधीवरुन नागरिक परत येत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणा-या ट्रकने चिरडलं आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नगर कल्याण महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. तर ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्ता रोको सुरु केला. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झालं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+