'मृत्यूनंतर काय होते? ऑनलाइन सर्च केले; त्यानंतर हाताची नस अन् गळा चिरला, महाराष्ट्र हादरला!
नागपुरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तीने गुगलवर मृत्यूनंतर काय होते असे टाकून सर्च केले अन् त्यानंतर हाताची नस अन् गळा चिरून जीवनयात्रा संपवली. ही घटना नागपुर जिल्ह्यातील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीने प्रथम तिचे मनगट चाकूने कापले आणि 'स्टोन ब्लेड चाकू'ने क्रॉस मार्क केले. यानंतर गळा चिरून आत्महत्या केली. खोलीतून जप्त केलेला चाकू नागपुरात मिळत नाही. तर तीने चाकू देखील ऑनलाइन मागवला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सायबर पोलिस मोबाइलचाही तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी पहाटे 5.45 वाजता तिची आई तिला उठवण्यासाठी खोलीत गेली तेव्हा ती बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हे पाहून आई ओरडली. आवाज ऐकून वडीलही खोलीत पोहोचले. यानंतर धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता ती गुगलवर 'मृत्यूनंतर काय होते' याची माहिती शोधत असल्याचे आढळून आले. पोलिसांना एक डायरीही सापडली आहे.
मृत तरुणीला येत होत्या 10 पेक्षा जास्त भाषा
मुलीला युरोपियन संस्कृतीत रस असल्याचे पोलिसांना डायरीतून समजले. तीने आपल्या डायरीमध्ये परदेशी संस्कृतींबद्दल लेखन केले. ती काही काळ मृत्यूवर संशोधनही करत होती. काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब नागपुरात स्थलांतरित झाले होते. मृत मुलगी ही एका खासगी शाळेतील बारावीची विद्यार्थी होती. तीला 10 ते 12 परदेशी भाषाही अवगत होत्या. ती अभ्यासात खूप हूशार होती. तीने कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. ती आपल्या आई-वडिलांसोबत छत्रपती नगर परिसरात राहत होती आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील नागपुरात आरबीआयचे प्रादेशिक संचालक आहेत. ती तिच्या आई-वडिलांसोबत घराच्या खाली असलेल्या खोलीतच राहत होती. त्याच्या मामाचे कुटुंब आणि आजी पहिल्या मजल्यावर राहते.
विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
एका अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या तर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वारंवार येत आहेत. पण अहवालानुसार राजस्थान या बाबतीत दहाव्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications