Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुइझ्झूंचे परिवर्तन-'इंडिया OUT' ते 'इंडिया Frist'; तर दुसरीकडे, मालदीव-भारत मैत्रीने चीन संतापला!

China Angry on Maldives India relationship : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू जे एकेकाळी 'इंडिया आऊट'च्या नारा देऊन सत्तेवर आले होते, तर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच पार पडलेल्या मालदीव दौऱ्याचे वर्णन हिस्टोरिकल असे म्हटले.

स्वातंत्र्यदिनाच्या विशेष सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याने दोन्ही देशांतील संबंधांना नवी दिशा दिली आहे. तर दोन्ही देशातील व्यापाराला देखील चालना मिळाली आहे.

भारताने मालदीवला $565 दशलक्ष (सुमारे 4,800 कोटी रुपये) ची मोठी क्रेडिट लाईन जाहीर केली असून, यामुळे मालदीवमधील अनेक विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे.

एकेकाळी भारताशी संबंध ताणणारे मुइझ्झू आता भारताला 'सर्वात विश्वासू भागीदार' आणि 'प्रथम प्रतिसादकर्ता' म्हणू लागल्याने, या बदलाने चीनला मोठा धक्का बसला आहे.

Maldives India relationship

संबंधांतील कडवटपणा संपला!

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारताने मालदीवच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ही क्रेडिट लाईन रुग्णालये, शाळा, गृहनिर्माण आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांसाठी वापरली जाईल.

यासोबतच, भारत आणि मालदीवमध्ये मुक्त व्यापार करारावर (FTA) चर्चा सुरू करण्यासाठीही एक करार झाला आहे. या घोषणा केवळ आर्थिक मदतीपुरत्या मर्यादित नसून, दोन्ही देशांतील विश्वास आणि सहकार्याचे प्रतीक आहेत.

विशेषतः, ज्या मुइझ्झूंनी भारतीय सैन्य मालदीवमधून परत पाठवले होते, त्याच मुइझ्झूंना आता भारताकडून मदतीची आणि व्यापार वाढवण्याची अपेक्षा आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने, भारतीय पर्यटकांची संख्या कायम ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

चीनला धक्का; बदलत्या भूमिकेवर संताप!

भारत आणि मालदीवमधील वाढत्या जवळीकतेमुळे चीनची चिंता वाढली आहे. चीनचे अधिकृत मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स' ने भारतीय माध्यमांच्या या भेटीच्या कव्हरेजवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय माध्यमे मालदीवमधील चीनचा प्रभाव कमी होत असल्याचे दाखवत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. बीजिंगस्थित सिंघुआ विद्यापीठाचे तज्ज्ञ कियान फेंग यांनी भारतीय माध्यमांच्या दृष्टिकोनाला 'जुनी विचारसरणी' आणि 'झिरो-सम गेम' मानसिकता असे संबोधले आहे.

जानेवारीमध्ये मुइझ्झूंनी बीजिंगला भेट दिली होती आणि तेव्हा त्यांनी चीनला मालदीवचा 'सर्वात जवळचा मित्र' म्हटले होते. तसेच, 'मालदीव जागतिक शांतता आणि न्यायासाठी चीनच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो, असेही ते म्हणाले होते.

मात्र, आता मुइझ्झूंचे परराष्ट्र धोरण संतुलित दिशेने जात असून, ते भारतासोबतच्या संबंधांना पुन्हा प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+