Nikku Madhusudhan: डॉ. निक्कू मधुसूदन कोण आहेत?, ग्रहावर जीवसृष्टी शोधणारा भारतीय वंशाचा शास्त्रज्ञ
Who is Dr Nikku Madhusudan : पृथ्वी तलावर असलेले माणसं शतकानुशतके या प्रश्नाचा कायमच विचार करत आहेत की, आपण या विश्वात एकटे आहोत का?
आता या प्रश्नाचे उत्तर मिळालेच समजा. कारण, पृथ्वीपासून सातशे ट्रिलियन मैल अंतरावर असलेल्या K2-18b नावाच्या ग्रहावरून शास्त्रज्ञांना असे संकेत मिळाले आहेत. जिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठा आहे.
केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाकडून त्याच्या वातावरणाचा शोध घेतला जात आहे. या शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व एक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ करत असल्याचे समोर आले आहे. ज्यांचे शिक्षण भारतात झालेले आहे.
कसं केलं जातंय संशोधन?
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून सुमारे 120 प्रकाशवर्षे दूर असलेला एक ग्रह सध्या चर्चेत आहे. ज्यावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रिटिशस्थित भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने K2-18b नावाचा हा ग्रह शोधला आहे.
हा शोध डायमिथाइल सल्फाइडच्या शोधावर केंद्रित होता. हा एक रेणू आहे जो पृथ्वीवर फक्त समुद्री शैवाल सारख्या सजीव प्राण्यांद्वारे तयार होतो. पृथ्वीसारखाच दुसरा ग्रह असल्याचा शोध लावणारे डॉ. निक्कू मधुसूदन कोण आहेत, त्यांचे शिक्षण व वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया..!

कोण आहेत डॉ. निक्कू मधुसूदन?
डॉ. निक्कू मधुसूदन हे भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 1980 मध्ये भारतात झाला. त्यांनी आयआयटी बीएचयूमधून बी.टेक पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून ग्रह विज्ञानात पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी मिळवली. या काळात त्यांनी एक्सोप्लानेट संशोधन तज्ज्ञ डॉ. सारा सीगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरूवात केली.
समुद्राच्या अस्तित्वाचेही संकेत
या ग्रहाच्या वातावरणात अमोनियाच्या अनुपस्थितीमुळे शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, K2-18b वर एक प्रचंड महासागर असू शकतो, जो अमोनिया शोषून घेत आहे. अमोनियाची उपस्थिती ही सहसा जीवनासाठी एक महत्त्वाचा संकेत असते, म्हणून त्याच्या अनुपस्थितीमुळे ग्रहावर महासागरासारख्या जीवनाला आधार देणाऱ्या संरचना असण्याची शक्यता वाढते. तथापि, हे देखील शक्य आहे की पृष्ठभागाखाली लावाचा महासागर असू शकतो, जो जीवनासाठी प्रतिकूल असेल.
डॉ. मधुसूदन हे कोणत्या विद्यापीठात शिकवतात?
डॉ. निक्कू मधुसूदन हे सध्या केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ज्या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, त्यांच्या वातावरण आणि रचनेवर तो संशोधन करत आहे. हायड्रोजनयुक्त वातावरण असलेल्या आणि महासागरांनी व्यापलेल्या या ग्रहांना हायसियन ग्रह म्हणतात.
आतापर्यंतचा सर्वात मजबूत पुरावा कसा सापडला?
बीबीसीच्या वृत्तानुसार, केंब्रिज विद्यापीठातील खगोलशास्त्र संस्थेतील प्रमुख संशोधक आणि प्राध्यापक डॉ. निक्कू मधुसूदन म्हणाले की, लवकरच ठोस पुरावे मिळण्याची अपेक्षा आहे. बाहेर कदाचित जीवन आहे याचा हा आतापर्यंतचा सर्वात मजबूत पुरावा आहे. मी वास्तववादीपणे असे म्हणू शकतो की आपण एक ते दोन वर्षांत या सिग्नलची पुष्टी करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications