गजवा-ए-हिंद म्हणजे काय? पाकिस्तानकडून का दिला जातोय हा नारा
सध्या भारताकडून उचलल्या जाणाऱ्या कठोर पाऊलांमुळे पाकिस्तान थरथर कापत आहेत. सध्या पाकिस्तानमधून गजवा-ए-हिंदचा नारा दिला जात आहे. दहशतवादी संघटना असो, पाकिस्तानी नेते असो किंवा तिथले तज्ज्ञ असो, अनेक लोकांची विधाने याचभोवती फिरत आहेत. पण तुम्हाला गजवा-ए-हिंद म्हणजे काय हे माहिती आहे का ? हे कुठून आले? याचा अर्थ काय?
जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतो तेव्हा 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख येतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. काही पाकिस्तानी गट आणि व्यक्ती भारताविरुद्ध धार्मिक युद्धाला चालना देण्यासाठी याचा वापर करतात.

तर सर्वप्रथम ते कुठून आले ते जाणून घ्या? 'गजवा-ए-हिंद' हा शब्द अरबी शब्द 'गजवा' पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'पवित्र युद्ध' किंवा 'धार्मिक युद्ध' असा होतो. हा शब्द काही हदीस (पैगंबर मुहम्मद यांचे म्हणणे) पासून आला आहे. पण दहशतवादी आणि कट्टरपंथी याला मुस्लिमांच्या विजयाची भविष्यवाणी मानतात.
पण विद्वानांना हे मान्य नाही. भारतातील जमियत उलेमा-ए-हिंदचे विद्वान मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी यांनी २०१९ मध्ये म्हटले होते की पाकिस्तानने हा शब्द भारताशी चुकीच्या पद्धतीने जोडला आहे.
हा नारा कोण देत आहे?
पाकिस्तानमध्ये, दहशतवादी गटांकडून भारताविरुद्धच्या जिहादचे समर्थन करण्यासाठी हा शब्द अनेकदा वापरला जातो. मग हा नारा कोण देत आहे? पाकिस्तानमधील झैद हमीद नावाच्या एका तज्ज्ञाने काश्मीर मुद्द्याशी जोडताना म्हटले होते की, आपण गजवा-ए-हिंदमध्ये प्रवेश करत आहोत.
भारतीय उपखंडातील अल-कायदा ही दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी लोकांना भडकवण्यासाठी याचा वापर करते. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी गट अन्सार गजवत-उल-हिंद या घोषणेद्वारे भारताविरुद्ध जिहादबद्दल बोलतो. लष्कर-ए-तैयबा 'गजवा-ए-हिंद' ही भारताला पराभूत करून मुस्लिम राज्य स्थापन करण्याची भविष्यवाणी म्हणून सादर करते.
विद्वान काय म्हणतात
गजवा-ए-हिंदचा नारा पाकिस्तानातील काही कट्टरपंथी गटांनी पसरवला आहे. या घोषणेवर आधारित ते भारत जिंकण्याचे स्वप्न पाहतात, परंतु मुस्लिम समुदाय आणि इस्लामने ते कधीही स्वीकारले नाही. अनेक इस्लामिक विद्वानांनी गजवा-ए-हिंदची संकल्पना चुकीची असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात की ही एक ऐतिहासिक घटना होती आणि सध्याच्या काळात ती अंमलात आणणे चुकीचे आहे. ते या विचारसरणीला दहशतवादाला प्रोत्साहन देणारी मानतात आणि तिचा निषेध करतात.
दरम्यान, आता भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवलाच जाणार अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल सुद्धा होणार आहेत.












Click it and Unblock the Notifications