Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-पाकिस्तान सीजफायरवर ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री बरळले,म्हणाले- दररोज लक्ष...

us role india pakistan ceasefire trump rubio : भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील (LoC) युद्धबंदी पुन्हा लागू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय दोन्ही देशांच्या शांततेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल होता. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या शांतता प्रक्रियेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला. त्यांनी दावा केला की या ऐतिहासिक निर्णयामध्ये अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने जगभरातील विविध व्यासपीठावरून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. आता त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक पाऊल पुढे टाकले, त्यांनी दावा केला आहे की अमेरिका दररोज दोन्ही देशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवते आणि ट्रम्प प्रशासनाने शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

एकंदरीतच, ट्रम्प आणि रुबियो यांच्या या विधानांवरून असे दिसून येते की अमेरिका केवळ संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तर स्वतःला शांततेचा 'सुपरहिरो' मानू लागला आहे.

us role india pakistan ceasefire trump rubio

मार्को रुबियो काय म्हणाले?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की अमेरिका दररोज भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवते, कारण युद्धबंदी राखणे खूप आव्हानात्मक आहे. ते म्हणाले की ट्रम्प प्रशासनाने दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यात आणि संघर्ष कमी करण्यात सक्रिय भूमिका बजावली.

रुबियो यांनी असेही निदर्शनास आणून दिले की युद्धबंदी केवळ दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबवण्यास सहमती दर्शविली तरच टिकू शकते आणि ती लागू करण्यात अडचणी येतात. कंबोडिया-थायलंड संघर्षावर अमेरिका कशी देखरेख ठेवते याचे उदाहरण त्यांनी दिले.

ट्रम्प यांनी वारंवार भारत-पाक युद्धबंदीचे श्रेय घेतले!

१० मे रोजी, जेव्हा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की वॉशिंग्टनच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत, तेव्हापासून त्यांनी जवळजवळ 40 वेळा हा दावा पुन्हा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यास मदत केली. त्यांनी असेही म्हटले आहे की त्यांनी अण्वस्त्रधारी दक्षिण आशियाई शेजाऱ्यांना सांगितले होते की जर त्यांनी संघर्ष थांबवला तर अमेरिका त्यांच्याशी भरपूर व्यापार करेल.

भारत सरकारने फेटाळला ट्रम्पचा यांचा दावा

तथापि, भारत सरकारने ट्रम्पचा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाकडून कोणताही दबाव नव्हता आणि कोणताही युद्धबंदी उपक्रम पूर्णपणे भारताच्या रणनीती आणि सार्वभौम निर्णयांवर आधारित होता. भारत सरकारने असेही म्हटले आहे की ट्रम्पच्या दाव्याला वास्तवात कोणताही आधार नाही आणि तो फक्त एक वैयक्तिक विधान आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+