'इतके टॅरिफ लावेन की तुमचे डोके फिरेल' ट्रम्पंनी कुणाला दिली होती धमकी, भारत की पाकिस्तान? वाचा
Trump threatened to impose taxes that would be a headache : "मी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना म्हणालो की, आम्ही तुमच्याशी कोणताही व्यापार करार करणार नाही. जर दोन्ही देशांनी युद्ध सुरू ठेवले तर आम्ही इतके जास्त टॅरिफ (आयात शुल्क) लावू की दोन्ही देशांचे डोके चक्रावून जाईल... सुमारे पाच तासांत, हे घडले..." असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारत पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध थांबवल्याचे महत्वाचे काम केले असा परत दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित मंत्रीमंडळ बैठकीत हे भाष्य केले आहे. ते म्हणाले, "आता कदाचित ते पुन्हा युद्ध सुरू होईल. मला माहित नाही, मला असे वाटत नाही पण जर युद्झ झाले तर मी ते थांबवेन. आम्ही अशा गोष्टी घडू देऊ शकत नाही."

ट्रम्प यांचा दावा काय आहे?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुसंघर्ष रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एका मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी थेट बोलणी करून ही परिस्थिती हाताळली.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले की जर त्यांनी संघर्ष थांबवला नाही, तर अमेरिका त्यांच्यासोबतचे सर्व व्यापार करार थांबवेल. ते म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून दोन्ही देशांमधील तणावाचे कारण विचारले आणि त्यानंतर त्यांनी पाकिस्तानशीही या विषयावर चर्चा केली.
"तर तुमचे डोके फिरेल.."
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मी काॅलवर पंतप्रधान मोदींना म्हटलो की, तुमचे आणि पाकिस्तानचे काय चालले आहे, युद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि त्यातच तुम्ही गुंतून पडाल. हे मी सांगितल्याचे ट्रम्प यांनी मंत्रीमंडळ बैठकीत सांगितले. या चर्चेदरम्यान, त्यांनी धमकी दिली की, जर दोन्ही देशांनी युद्ध सुरू ठेवले तर ते इतके जास्त टॅरिफ (आयात शुल्क) लावतील की दोन्ही देशांचे डोके चक्रावून जाईल.
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या या हस्तक्षेपामुळे केवळ पाच तासांत दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला आणि युद्धाची शक्यता टळली. ट्रम्प यांनी असाही दावा केला की या संघर्षात सहा किंवा त्याहून अधिक लढाऊ विमाने पाडण्यात आली होती, ज्यामुळे खूप मोठे नुकसान झाले.
भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
- ट्रम्प यांच्या या दाव्यावर भारताने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारताच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची (third party) मध्यस्थी नव्हती.
- भारतीय अधिकाऱ्यांनुसार, १० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी संचालकांनी (DGMO) थेट त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या चर्चेतूनच शस्त्रसंधी (Ceasefire) झाली.
- भारत सरकारने हे स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णपणे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संवादावर आधारित होता आणि त्यात कोणत्याही बाहेरील हस्तक्षेपाची गरज नव्हती.
- भारत आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणांसाठी कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दबावाला बळी पडत नाही, असे भारताने यापूर्वीही स्पष्ट केले आहे.
- थोडक्यात, डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध टाळले, तर भारत सरकारने हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत आणि म्हटले आहे की हा मुद्दा दोन्ही देशांनी आपापसातच सोडवला.












Click it and Unblock the Notifications