Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतातील पीक चोरल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी बांग्लादेशाच्या शेतकऱ्यांना पळू-पळू मारलं; नेमकं काय घडलं

शेतातील पीक चोरल्याच्या कारणातून भारतीय शेतकरी आणि बांग्लादेशातील शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. या दोन्ही गटांकडून हाणामारी, दगडफेक झाली. दोन्ही गटांत धुमश्चक्री झाल्यानंतर थेट बीएसएफला मध्यस्थी करावी लागली. दोन्ही देशांतील जवांनांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थितीत आटोक्यात आली. दरम्यान, भारतीय शेतकऱ्यांनी बांग्लादेशच्या चोरट्या शेतकऱ्यांना सीमारेषेवरुन हुसकावून लावले.

Indian farmers dispute

नेमके काय झाले?

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर हे गाव बांग्लादेशच्या सीमेवर आहे. येथील सीमेवर तारेचे कुंपन नसल्याने, भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात ये-जा सुरु असते. आज सकाळी भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पीके बांग्लादेातील शेतकरी चोरुन नेत असल्याचे समजले. त्यानंतर सीमेवरील शेतकऱ्यांनी बांग्लादेशच्या शेतकऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर वाद वाढला.

दगडफेक झाली

वाद वाढल्यानंतर या भागात दोन गटांत दगडफेक सुरु झाली. एकमेकांना शिविगाळ सुरु झाली. वाद वाढल्यानंतर चोरट्या शेतकऱ्यांचा पाठलाग सुरु करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू लागल्यानंतर दोन्ही देशांच्या बीएएसएफ जवानांनी मध्यस्थी केली. मात्र दगडफेक सुरु झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थीती नियंत्रणात आणली.

पसस्परांवर आरोप

दरम्यान, या प्रकारानंतर दोन्हीकडील शेतकऱ्यांनी एकमेकांवर आरोप केला. मात्र बांग्लादेशचे शेतकरी पळून गेल्याने, त्यांनीच आमचे पीक चोरल्याचे भारतीय शेतकऱ्यांचे म्हणणे होते. बांग्लादेश सीमावर्ती पोलिसांनी यापूर्वी या भागात काटेरी कुंपन घालण्यास विरोध केला होता. हा विरोध शेतकऱ्यांच्या चोरीच्या उद्देशानेच होता का, असा सवाल आता भारतीय शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हाणामारी व त्यानंतर झालेल्या दगडफेकीत नेमके किती जण जखमी झाले, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+