मोठी बातमी ! पाकिस्तानचे सहा सैनिक ठार? भारतीय जवानांनी घुसखोरीला दिलंय चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते अधिकारी त्यांच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. काही बातम्यांनुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पाच-सहा सैनिक ठार मारले आहेत. मात्र या वृत्ताचा भारतीय लष्कराने इन्कार केलाय. नियंत्रण रेषेवर युद्धबंदी लागू आहे, असं त्यांनी सांगितलंय. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याने दिलेल्या प्रतिउत्तरात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जातेय.

नेमके काय घडले?
पुंछच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्य चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानच मोठ नुकसान झाले. या गोळीबारात पाकिस्तानचे काही सैनिक जखमी झाले आहेत. त्यांच्या ५ ते ६ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान मागच्या आठवड्याभरापासून LOC वर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावण्यासाठी अलर्ट मोडवर आहे.
आज बैठक
पाकिस्तानकडून सातत्याने सुरु असलेल्या या कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर आज जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हा एक उच्चस्तरीय समीक्षा बैठक घेणार आहेत. या बैठकीला उप राज्यपालांशिवाय जम्मू-काश्मीरचे DGP नलिन प्रभात, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उच्च अधिकारी, IGP उपस्थित राहतील. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी घडविलेल्या ब्लास्टमध्ये दोन भारतीय जवान शहिद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानानांनीही आता अँक्शन घेतली असल्याचे सांगितले जातेय.












Click it and Unblock the Notifications