इंडियन आर्मीचा अपमान करणाऱ्या आफ्रिदीचे स्वागत;भारतीय समुदाच्या 'या' कृतीने लोक संतापले, काढली लाज!
Pakistani cricketer Shahid Afridi Video Viral : ''ही देशभक्ती आहे की हरामखोरी? शत्रूचे स्वागत? भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्याचा दुबईत सन्मान करण्यात आला'' माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे विशेष स्वागत पाहून संतप्त लोकांनी सोशल मीडियावर अशी टीका केली. दुबईमध्ये केरळ समुदायाच्या लोकांनीच शाहिद आफ्रिदीचे खास पद्धतीने स्वागत केल्यानंतर आता भारतातील लोकांनी केरळ समुदायाच्या लोकांची फार इज्जत काढली.
केरळ समुदायाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत केले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदीने भारतविरोधी विधाने केल्यामुळे त्यावेळी संताप व्यक्त केला गेला. दुसरीकडे, लोकांनी या भारतीय समुदायाच्या आदरातिथ्यावर टीका केली आहे. ज्याने भारतीय सैन्याचा अपमान केला होता. त्यालाच तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावता, या लोकांना लाज कशी वाटत नाही, हे अतिशय लज्जास्पद आहे, अशी टीका केली जात आहे.

"शाहिद आफ्रिदीचे 'बूम बूम' स्वागत - देशवासीयांमध्ये संताप"
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शाहिद आफ्रिदीला कार्यक्रमात स्टेजवर बोलावताना दिसत आहे, जिथे लोकांनी टाळ्या आणि घोषणाबाजीने त्याचे स्वागत केले. आफ्रिदीने आपल्या भाषणात म्हटले की, त्याला "भारताचा केरळ भाग आणि त्याचे जेवण खूप आवडते.
Why on earth are Indians hosting Pakistani cricketers Shahid Afridi & Umar Gul at a UAE Kerala community event? This is bizarre. Pahalgam Terror Attack isn’t enough to shake their conscience? A native of Edappally, Kerala named N. Ramachandran was a victim at Pahalgam. Tone Deaf? pic.twitter.com/4zu2ibaWU0
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 30, 2025
आफ्रिदी स्टेजवर येताच लोकांनी केले "बूम बूम" स्वागत
आफ्रिदीचे प्रसिद्ध टोपणनाव असलेल्या बूम बूम असा जयजयकार करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल आफ्रिदी म्हणाला, "हो गया बूम बूम." तेथे उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने हे "बूम बूम" जयजयकार केला.
WHY? WHY? WHY?
— Rahul Shivshankar (@RShivshankar) May 30, 2025
Former Pakistani cricketers Shahid Afridi and Umar Gul received a rapturous welcome from the Indian Kerala community during an event held at the Pakistan Association Dubai (PAD).
Afridi of all people? pic.twitter.com/k95BQEqK6R
व्हिडिओवर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या
ही क्लिप एक्सवर एका वापरकर्त्याने कॅप्शनसह शेअर केली होती, "काय लाजिरवाणी गोष्ट आहे!! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्याच्या विषारी विधानांनंतर देखील केरळी लोक दुबईमध्ये 'बूम बूम'सह या भारतविरोधी पाकिस्तानीचे स्वागत करतात.
2 weeks ago this bas#ard Shahid Afridi had taken out a victory march claiming Pak won the conflict
— Sameer (@BesuraTaansane) May 30, 2025
Yesterday spineless shameless Indian Kerala community in Dubai felicitated him
Inka OCI cancel kar do @HMOIndia pic.twitter.com/mKOzxZmyah
सोशल मीडियावर लोक म्हणाले - हे लज्जास्पद
आफ्रिदीची वादग्रस्त विधाने आणि घटनेची वेळ पाहता, केरळ समुदायाने त्याचे स्वागत केल्यावर लोक संतापले. एका वापरकर्त्याने लिहिले, "देशभक्ती षटकारासाठी गेली... लज्जास्पद. केरळ समुदायाकडून हे अपेक्षित नव्हते."
खूप लज्जास्पद
दुसऱ्याने म्हटले, "कोणी स्वतःच्या देशाशी इतके बेईमान कसं असू शकते... यांना लाजा वाटत नाही का?, तुम्हाला सर्वात सुशिक्षित मानले जाते, काहीतरी शिका... खूप लज्जास्पद. त्याचबरोबर सोशल मीडियावर तिसऱ्या व्यक्तीने प्रश्न केला, "त्यांच्याकडे भारतात दुसरा कोणी आदरणीय व्यक्ती नव्हता का? हे सर्व पाहून खूप वाईट वाटते."
Height Of Shamelessness | Netizens Slam Kerala Community In Dubai For Warmly Welcoming ex Pak cricketer Shahid Afridi To An Event | This triggered negative reaction among the netizens | As Afridi had taken venomous stand against India following recent Pahalgam terror attack pic.twitter.com/kQjZmaW6zt
— Pradeep Dutta (@deepduttajourno) May 31, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदी काय म्हणाला होता?
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी आणि राजनैतिक तणावादरम्यान शाहिद आफ्रिदीने अलीकडेच भारताविरुद्ध अनेक विधाने केली. एप्रिलमध्ये पाकिस्तानच्या 'समा टीव्ही'वर बोलताना आफ्रिदी म्हणाला, "जर भारतात कोणताही फटाका फुटला तर पाकिस्तानला दोष दिला जातो.
त्यांनी भारतीय सैन्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, "तुमच्या लोकांकडे काश्मीरमध्ये 8 लाखांची फौज आहे, तरीही हे घडले. याचा अर्थ तुम्ही लोक निरुपयोगी, अक्षम आहात, तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही. त्याचा दोष तुम्ही पाकिस्तानवर का देता?, असे म्हणत त्यानी भारतीय लष्करावर टीका केली होती.












Click it and Unblock the Notifications