Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत हल्ला करणारच; पाक सरकारची पळापळ, POK तील मदरसे बंद केले, दोन महिन्यांचे रेशनही भरले

जम्मू- काश्मिरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव आता चांगलाच वाढला आहे. पाकिस्तानसोबतचे रोज कोणते ना कोणते कठोर निर्णय भारत घेत आहे. त्यातच शुक्रवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानी जनतेला अलर्ट केलेय. पंतप्रधान चौधरी अन्वर उल हक यांनीही नियंत्रण रेषेजवळील १३ मतदारसंघातील नागरिकांना दोन महिन्यांचे राशन भरुन ठेवण्याचे आवाहन केले.

India-Pakistan tension

काय म्हणाले हक?

विधानसभेत शुक्रवारी चौधरी अन्वर उल हक यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधीत केले. त्यात भारत पाकिस्तानवर नक्की हल्ला करेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चौधरी अन्वर उल हक म्हणाले की, नियंत्रण रेषेजवळील १३ मतदारसंघामध्ये दोन महिन्यांसाठी अन्न पुरवठा साठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न, औषधे आणि सर्व मुलभूत गरजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने १ अब्ज रुपयांचा आपत्कालिन निधी तयार केला आहे.

मदरसे केले बंद

पंतप्रधानांनी भारत-पाक युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, नियंत्रण रेषेवरील भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी सरकार आणि खासगी यंत्रणा तैनात केल्या आहेत. पाकव्याप्त काश्मिरमधील १०० हून अधिक मदरसे किमान १० दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. शाहबाज सरकारला भीती आहे की भारत पीओके (व्याप्त काश्मीर) मध्ये भारत लष्करी कारवाई करू शकतो. भारत लवकरच आपल्यावर हल्ला करू शकतो याचे विश्वसनीय पुरावे पाकच्या नेत्यांनी बोलताना सांगितले आहेत.

मोदींचे लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे पंतप्रधान पुढे म्हणाले की, नियंत्रण रेषेवरील भागात रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणा देखील तैनात केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराला दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही युद्धासाठी जनतेने तयार रहावे, असे आवाहन केले आहे.

दोन्हींकडे तणाव वाढला

जम्मू-काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत चालला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने पाकिस्तानवर आरोप केल्यानंतर या दोन्ही देशांत वाद वाढला. भारताने सिंधू करार रद्द केला तर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. आताही या दोन्ही देशांत युद्धाची रणनिती सुरु असल्याचे सांगण्यात येते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+