पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांची बँकॉकमध्ये भेट, भारत-बांगलादेश संबंध सुधारतील का?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यात बँकॉकमध्ये बैठक झाली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. आज अखेर या दोन्ही नेत्यांमध्ये थायलंडमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे.
गुरुवारी बिमस्टेक शिखर परिषदेपूर्वी थायलंडच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या अधिकृत रात्रीच्या भोजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस एकत्र बसलेले दिसले. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्यात बैठक पार पडली.

दरम्यान ऑगस्ट 2004 मध्ये शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक होती. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. शेख हसीना यांचे सरकार बांगलादेश सोडल्यापासून बांगलादेशचे भारताशी संबंध चांगले राहिलेले नाहीत. मोहम्मद युनूस यांच्या धोरणांमुळे संबंध बिघडले आहेत.
PM Modi meets Bangladesh Chief Adviser Muhammad Yunus on sidelines of BIMSTEC Summit
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2025
Read @ANI Story | https://t.co/9cNd3hqYA9#PMModi #Bangladesh #muhammadyunus #BIMSTEC pic.twitter.com/AXcZjBYBrS
रिपोर्टनुसार यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शेख हसीना, चिकन नेक आणि चीनशी मैत्री यावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांची ही भेट अशा वेळी झाली जेव्हा बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. दरम्यान मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच चीनला भेट दिली होती, जिथे त्यांनी बीजिंगमध्ये बांगलादेशचे वर्णन 'समुद्राचे रक्षक' असे केले. युनूस म्हणाले की, भारतातील सात राज्ये भारताचा पूर्व भाग. ज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात, ते भारतातील भूपरिवेष्ठित क्षेत्र आहेत. त्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी आपणच महासागराचे एकमेव रक्षक आहोत, असं त्यांनी म्हटलं होत. ज्याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की बंगालच्या उपसागरात भारताला सर्वात मोठा किनारा आहे.
कोण आहेत मुहम्मद युनूस ?
मुहम्मद युनूस हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत. सन 2006 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महंमद युनूस हे बँकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत. आईवडिलांच्या नऊ अपत्यापैकी तिसरे अपत्य असलेल्या युनुस ह्यांनी अर्थशास्त्र ह्या विषयात ढाका विद्यापीठातून बी.ए.आणि एम.ए.केले.काही वर्षे ढाका विद्यापीठात अध्यापन केले.फुलब्राईट शिष्यवृत्तीद्वारे व्हंडरबिल्ट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी.केली. काही काळ तिथे प्रोफेसर म्हणून काम केले.साल 1972 मध्ये ते चितगाव विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.
दरम्यान ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात पळ काढल्यावर युनूस यांनी मुख्य सल्लागार या नात्याने देशाचा कारभार पाहिला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1970 च्या दशकात मुहम्मद युनूस हे सूक्ष्मवित्तव्यवस्थेचे प्रणेते म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांनी देशातील सर्वात गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली.
युनूस यांना या सगळ्याची प्रेरणा चितगाव विद्यापीठाजवळील एका गरीब गावाला दिलेल्या भेटीतून मिळाली. त्यांनी सुरुवातीला अनेक गावातील गावकऱ्यांना दहा डॉलर्स उधार दिले. महंमद युनूस यांनी ग्रामीण बँकेबाबत केलेले कार्य फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मते, गरिबांना छोट्या छोट्या रकमेची कर्जे देणे आवश्यक आहे. बँकेकडे पुरेशा प्रमाणात तारण न देऊ शकणाऱ्या गरिबांना मदत केली पाहिजे. गरीब व छोटे कर्जदारही वेळेत कर्जाची परतफेड करू शकतात. पण त्यांना योग्य संधी दिली गेली पाहिजे असे मत त्यांनी मांडले होते.












Click it and Unblock the Notifications