Fact-Check: पाकसोबत युद्ध करण्यास नकार, भारतीय एअर मार्शलची उचलबांगडी; पाकचा दावा खरा की खोटा?
भारताचे एअर मार्शल सुजीत धारकर यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास नकार दिला. त्यानंतर भारत सरकारने त्यांची या पदावरुन उचलबांगडी केली असा दावा, पाकिस्तानी मीडियाने केला होता. याबाबत पाकिस्तानी सोशल मीडियावर गेल्या काल दिवसभर मॅसेज फिरत राहिले. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन हा मॅसेज व्हायरल करण्यात आला. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काय होता मॅसेज?
भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख सुजीत धारकर यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास नकार दिल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला होता. त्याचबरोबर त्यांनी युद्धास नकार दिल्यानंतर भारताने त्यांची या पदावरुन उचलबांगडी केली, असेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले होते. पाकसमर्थक अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन दोन दिवसांपासून ही पोस्ट चांगलीच व्हायरल करण्यात आली होती.
खरं काय आहे?
प्रेस इन्फाॅर्मेशन ब्युरीच्या फॅक्ट चेक युनिटने या प्रकरणात लक्ष घातले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्टबाबत पीआयबीने खुलासा केला. त्यात म्हटले आहे की, एअर मार्शल धारकर हे उपप्रमुख म्हणून ३० एप्रिलला निवृत्त झाले. त्यांनी हवाई दलात ४० वर्षे सेवा केली. निवृत्तीच्या दिवशी एअर मार्शल धारकर यांना वायु भवन येथील हवाई मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे पाकिस्तानी मीडियात करण्यात आलेला हा दावा सपशेल खोटा आहे, असे पीआयबीने स्पष्ट केले.
Several pro-Pakistan social media accounts have falsely claimed that Air Marshal Sujeet Pushpakar Dharkar, Vice Chief of the Air Staff, has been sacked for refusing to fight a war against Pakistan #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 1, 2025
❌The claims being made in these posts are #fake
✅ Air Marshal… pic.twitter.com/ydBZOJIv9r
भारत-पाक तणाव वाढला
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. सिंधू जल करार रद्द करत सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहिम हाती घेत त्यांना पाकिस्तानाच परत पाठवविले आहे. पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी भारताने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. याशिवाय अटारी-वाघा बाँर्डरही बंद करण्यात आली आहे. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही सिमला करार रद्द केला आहे. सरकारने गुरुवारी अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याची मुभा शिथिल केली. परंतु अद्याप पाकिस्तानने भारतीयांसाठी अशी अट शिथिल केलेली नाही.












Click it and Unblock the Notifications