हे आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर, लग्नसोहळ्यांवर 3 महिने बंदी, हजारो लोक रुग्णालयात दाखल
Air Pollution : उत्तर भारतातील अनेक राज्ये वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत, जिथे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दरम्यान पाकिस्तानच्या अनेक भागात या नोव्हेंबरमध्ये सर्वात खराब वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला गेला आहे. जगातील सर्वाधिक वायू प्रदूषणाच्या घटनांमध्ये पाकिस्तानातील लाहोर हे सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे.
लाहोरमध्ये शुक्रवारी जवळपास 1600 AQI नोंदवण्यात आला आहे. येथील लोक विषारी धुक्यामुळे अत्यंत त्रस्त आहेत. स्विस मॉनिटर एजन्सी IQAir नुसार शुक्रवारी सकाळी लाहोरच्या CERP कार्यालय परिसरात AQI 1587 होता. याव्यतिरिक्त लाहोरमधील इतर तीन भागात वाय प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सय्यद मरातीब अली रोड, पाकिस्तान अभियांत्रिकी सेवा कार्यालय आणि VTS याठिकाणी AQI पातळी 1000 च्या वर नोंदवली गेली आहे.

लाहोरची हवेची गुणवत्ता चिंताजनक
गुरुवारी लाहोरचा सरासरी AQI 1300 होता. त्यामुळे नोव्हेंबर 2024 मध्ये लाहोर हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असूनही शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या धोकादायक परिस्थितींवर नियंत्रणात मिळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी शाळा आणि उद्याने बंद केली आहेत. तसेच नागरिकांनी जास्तीत प्रमाणत मास्कचा वापर करण्यासाठी बंधनकारक केलं आहे.
एकट्या लाहोरमध्ये धुरामुळे श्वसन आणि विषाणूजन्य संसर्गाची 15,000 हून अधिक रुग्णांची एक दिवसात नोंद झाली आहे. घटत्या तापमानामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे एरी न्यूजने ही आकडेवारी नोंदवली आहे. हिवाळ्यातील धुक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तान सरकार विविध उपाययोजनांद्वारे सतत सक्रियपणे काम करत आहे.
विवाहसोहळ्यांवर तीन महिन्यांची बंदी
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्था बंद करून कठोर पावले उचलली आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी विवाहसोहळ्यांवर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. तसेच प्रांताच्या अनेक भागांना प्रभावित करणाऱ्या धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी नवीन वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
लाहोर आणि मुलतान ही सध्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. दररोज 70,000 हून अधिक लोक धुक्याच्या संसर्गाशी संबंधित आरोग्य समस्यांसाठी उपचार घेतात. हिवाळ्यातील गहू-लावणीच्या हंगामात वाहनांचे उत्सर्जन,औद्योगिक इंड्रस्टीज आणि पीक जाळणे यामुळे हे घातक धुके तयार होत आहे.












Click it and Unblock the Notifications