104 प्रवाशांची सुटका, 16 दहशतवादी ठार! 48 तास पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; आतापर्यंत काय घडलं? वाचा
Pakistan Train jaffar express Hijack Update : पाकिस्तानमध्ये बलुच दहशतवाद्यांनी चक्क रेल्वेच हायजॅक केली असून 48 तासांपासून हा खेळ सुरु आहे. येथे बलूच फुटीरतावादी संघटना (BLA) बलुच लिबरेशन लष्करी संघटनेने पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली.
यानंतर दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस ठेवले असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बचाव मोहीम सुरू केली. आतापर्यंत 104 ओलिस प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 16 दहशतवादी मारले गेले आहेत, मात्र 23 लोक अजूनही अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे.

कसा झाला हल्ला?
वनइंडिया हिंदीने या घटनेसंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, जाफर एक्स्प्रेस क्वेट्टाहून पेशावरला जात असताना बलुचिस्तानच्या काछी (बोलान) जिल्ह्यातील पिरोकनारी भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. प्रथम रेल्वे रुळावर स्फोट झाला, त्यामुळे खळबळ उडाली. यानंतर दहशतवाद्यांनी ट्रेनवर जोरदार गोळीबार सुरू केला. एका बोगद्यात ट्रेन थांबवण्यात आली आणि 214 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले. 30 सुरक्षा जवानांना ठार केल्याचा दावाही दहशतवाद्यांनी केला आहे.
पाकिस्तानी सुरक्षा दलांचे ऑपरेशन
जिओ न्यूजनुसार, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी तात्काळ स्पेशल ऑपरेशन सुरू केले आणि दहशतवाद्यांना घेरले. आतापर्यंत 104 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये 58 पुरुष, 31 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे. यात 16 दहशतवादी मारले गेले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अजूनही 23 प्रवासी अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही प्रवाशांना क्वेट्टाला पाठवण्यात आले आहे, तर ट्रेन अजूनही बोगद्यात उभी आहे.
दहशतवाद्यांच्या मागण्या आणि धमकी
- द बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि ओलीसांच्या बदल्यात काही अटी घातल्या आहेत.
- सर्व बलुच राजकीय कैद्यांची सुटका आणि बेपत्ता करणे. मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व ओलीस ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
- पाकिस्तानी लष्कराचा जमिनीवरील हल्ला हाणून पाडल्याचा दावा केला.
काय म्हणाले पाकिस्तानी राष्ट्रपती आणि पंतप्रधान?
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची प्रतिक्रिया पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांच्या शौर्याचे कौतुक केले आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे सांगितले. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या कारवाईबाबत केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.












Click it and Unblock the Notifications