Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर तणावाची स्थिती, जमाव गेटवर चढला, सुरक्षा काढल्याचा आरोप

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सिंधू पाणी करार पुढे ढकलण्याच्या भारताच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशात तणावाची स्थिती पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे इस्लामाबादमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. तर काही लोक थेट उच्यायुक्तालयाच्या गेटवरुन चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा जाणूनबुजून काढून टाकल्याचा आरोप केला जात आहे.

Pakistan news

पाकिस्तानने काय घेतले निर्णय?

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. यामध्ये, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची घोषणा केली. यामध्ये 1972 चा शिमला करार देखील समाविष्ट आहे. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर तो युद्धाचा संकेत मानला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी तसेच वाघा बॉर्डर क्रॉसिंगसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश

दुसरीकडे, भारत सरकारने बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना दिल्लीत बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांविरुद्ध 'पर्सोना नॉन ग्राटा'ची अधिकृत नोट सोपवली. त्याला एका आठवड्यात भारत सोडावा लागेल. 'पर्सोना नॉन ग्राटा' म्हणजे 'अनिष्ट व्यक्ती'. हा एक लॅटिन शब्द आहे. ज्या व्यक्तीला देशात राहण्याची किंवा प्रवेश करण्याची परवानगी नाही अशा व्यक्तीसाठी याचा वापर केला जातो. हे सामान्यतः राजनैतिक बाबींमध्ये वापरले जाते.

Take a Poll

पहलगाम हल्ल्यात 28 पर्यंटकांची हत्या

मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ही घटना बैसरण खोऱ्यात घडली. ते पहलगाम शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांनी काही लोकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची एक युनिट असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने स्वीकारली आहे. टीआरएफचा दहशतवादी सैफुल्ला खालिद हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा गुप्तचर संस्थांचा दावा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+