पहलगाम हल्ला, भारताचा इशारा मिळताच पाकिस्तानचे चिथावणीखोर पाऊल, मिसाईल चाचणीचा घेतला निर्णय
Pakistan Missile Test : जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आणखी एक चिथावणीखोर वागणूक पाहायला मिळत आहे.
पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेले हत्याकांड अद्याप विसरलेही नाही, अवघे दोन दिवसच या घटनेला झाले असताना पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने याबाबत एक अधिसूचना देखील जाहीर केली.
पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. भारताने केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या हालचालीवर भारतीय यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.

क्षेपणास्त्र चाचणीसाठी अधिसूचना जारी
वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण दलातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'पाकिस्तानने 24-25 एप्रिल रोजी त्यांच्या स्पेश इकॉनॉमी क्षेत्रातील कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमीनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. या सर्व घडामोडींवर आता भारतीय यंत्रणांचे लक्ष असणार आहे.
Pakistan has issued a notification to carry out a surface-to-surface missile test off its Karachi coast along its coastline within its Exclusive Economic Zone on April 24-25. Indian agencies concerned are keeping a close watch on all the developments: Defence sources
— ANI (@ANI) April 24, 2025
भारताचे कठोर पाऊल
दरम्यान, भारताने एक कठोर पाऊल उचलले आहे. सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला. पहलगाम घटनेनंतर भारताने केलेल्या कृती बेजबाबदार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी 1960 चा सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडण्यासाठी पाऊल उचलले.
क्षेपणास्त्राची मारा क्षमता 480 किमी लांब
पाकिस्तान ज्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे त्याची मारक क्षमता 480 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. यासाठी पाकिस्तानने अरबी समुद्र प्रदेशाला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केले आहे.
पाकिस्तान 24 ते 25 एप्रिल दरम्यान या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊ शकते. यासाठी शेजारच्या देशाने थेट गोळीबाराचा इशारा दिला आहे. खलाशांनाही या भागापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सीसीएस बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय, पाक येणार अडचणीत
पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर, बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली. सीसीएसने अटारी येथील चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली आहे. भूतकाळात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले असे कोणतेही व्हिसा रद्द केले गेले आहेत असे मानले जाईल.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications