पाकमध्ये बाईक गॅंगचा धूमाकुळ; भारताचा शत्रू ठार; दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडरला केले मातीमोल!
Pakistan lashkar e tayyiba leader maulana kashif ali killed : पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी टारगेटवर असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांना खत्म करण्यासाठी एक दुचाकी बंदूकधारी गॅंग कार्यरत आहे. विशेष म्हणजे या दुचाकी गॅंगने एका महिन्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकंदरीतच काय, या गॅंगमुळे भारताच्या दुश्मनांचा नायनाट होऊ लागला आहे.
नेमकं काय घडलं?
एका अज्ञात दुचाकीस्वार बंदूकधाऱ्याने पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली. यावेळी त्याच्या टारगेटवर भारताचा दुश्मन असलेल्या लष्कर दहशतवादी मौलाना काशिफ अली होता. त्याने गोळ्या घालून मौलाना काशीद याला ठार मारले. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Photo Credit- @FrontalForce
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये भारताच्या शत्रूंचा खात्मा सुरू आहे. अज्ञात मोटारसायकलस्वाराने केलेला कहर अजूनही थांबलेला नाही. आता खैबर पख्तूनख्वा येथील स्वाबी जिल्ह्यात एका अज्ञात दुचाकीस्वाराने एका दहशतवाद्याची हत्या केली आहे. त्या दहशतवाद्याचे नाव मौलाना काशिफ अली आहे. तो कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक टॉप कमांडर होता. त्याची हत्या झाल्याने भारताला एक दिलासाच मिळाला आहे.
कोण आहे मौलाना काशिफ अली?
दशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा एक वरिष्ठ कमांडर अशी मौलाना काशिफ अलीची ओळख आहे. काशिफ अली हा पाकिस्तानातील तरुणांचे ब्रेनवॉश करायचा. तो त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करायचा. काशिफ अली अनेक मशिदी आणि मदरशांचा प्रभारी प्रमुख आहे. स्वतःच्या उद्देशाने पाकिस्तानी तरुणांना दिशाभूल करायचे काम करायचा. याशिवाय तो दहशतवाद प्रशिक्षण केंद्रांमध्ये जिहादी व्याख्याने देत तरुणांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम करत असे. काशिफ अली हा लष्कर या दहशतवादी संघटनेच्या आघाडीच्या राजकीय संघटना पीएमएमएलशी देखील संबंधित होता.
BREAKING : Founder member of Terrorist organisation Lashker-E-Taiba and brother in law of India's most wanted terrorist Hafiz Saeed, Maulana Kashif Ali shot dead by unknown gunmen in Swabi, Pakistan. pic.twitter.com/PHhmLWwYs9
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) February 17, 2025
दहशतवादी संघटनांनी पाक सरकावर साधला निशाणा
मिळालेल्या माहितीनुसार, व पाकिस्तानातील काही माध्यमांच्या हवाल्यानुसार, दहशतवादी काशिफ अलीच्या हत्येनंतर, दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी काशिफ अलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली. काही सोशल मीडिया पोस्टवर तर काशीद अलीला पाकिस्तानी प्रेमी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे.
महिन्याभरात चार दहशतवादी ठार
गेल्या एका महिन्यात, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी गूढ परिस्थितीत काही घटनांमध्ये मारले गेले आहेत. यापैकी दोन दहशतवादी एका कथित रस्ता अपघातात मारले गेले. काशिफ अली हा एका महिन्यात चौथा बळी होता. काशिफ अलीच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. यावेळी त्याचा सगळा राग पाकिस्तान सरकार, त्यांची गुप्तचर संस्था आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवर आहे.












Click it and Unblock the Notifications