Lahore Airport Fire : पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर भीषण आग का लागली?, उड्डाणे रद्द, प्रवाशी अडकले!
Pakistan Lahore Airport Fire : पाकिस्तानच्या लाहोर येथील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली. हजारो प्रवाशी सद्या या ठिकाणी अडकलेले आहेत. एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये तणावाची स्थिती आहे, अशातच ही दुर्घटना घडली आहे. नेमकं विमानतळावर काय घडलं होतं, आग कशी लागली याविषयी जाणून घेऊया.

काय घडलं नेमकं एअरपोर्टवर?
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर शनिवारी सकाळी अचानक आगीची घटना घडली. यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पाकिस्तानी लष्कराचे एक विमान लाहोर विमानतळावर उतरत होते. यादरम्यान, टायरला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण मिळवल्याचे देखील सांगितले जात आहे.
Fire breaks out at Allama Iqbal International Airport. It is also known as Lahore International Airport, Pakistan.#Terrorism #Fire #PehalgamTerroristAttack pic.twitter.com/oFeZCp7MNQ
— Kapadia CP (@Ckant72) April 26, 2025
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विमानतळ परिसरात उपस्थित असलेले लोकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. व्हायरल झालेल्या एका 32 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये प्रवासी घटनेबद्दल बोलत आहेत. काळ्या धुराचे ढग सतत वर येत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, कोणत्याही नुकसानीचे वृत्त अद्याप या ठिकाणाहून आलेले नाही.
याआधीही घडली होती आगीची घटना
पाकिस्तानच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही या विमानतळावर आग लागल्याच्या बातम्या आल्या आहेत.
ज्यामुळे पाकिस्तानचे खराब व्यवस्थापन आणि सुरक्षा मानकांबद्दलचे अज्ञान अधोरेखित होते. गेल्या वर्षी 9 मे रोजी लाहोर विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरच्या छतावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती. या घटनेमुळे विमानतळाची संपूर्ण इमिग्रेशन व्यवस्था ठप्प झाली होती.
पहलगाम हल्ल्यात 28 जणांची हत्या
दरम्यान, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला. धर्म विचारून पुरुषांवर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. अनेक पुरुषांना त्यांची ओळख विचारण्यात आली. तसंच नमाज पढण्यास सांगण्यात आलं. गोळीबार करुन पुरुषांची हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे भारत सरकारच्या वतीने देखील पाकिस्तान विरोधात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानची चांगली कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications