पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निघाली इज्जत; 'सुखोई'चा दावा फेक, नेमकं काय घडलं!
Pakistan Fake Narrative Exposed : भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. त्यावर पाकिस्तानकडून अनेक खोटे दावे केले गेले. आता ते दावे सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड होत आहेत.
यापूर्वी पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही, परंतु सॅटेलाईट फोटोद्वारे ते पूर्णपणे उघड झाले आहे. नंतर, पाकिस्तानी मीडिया आणि सरकारनेही नुकसान झाल्याचे मान्य केले.
आता आदमपूर एअरबेसवरील हल्ला आणि सुखोई विमान पाडल्याच्या फेक नरेटिव्हचा देखील पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, शाहबाज शरीफ सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर फार लाज काढली जात आहे.

पाकिस्तानचा खोटा दावा उघड झाला
ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानी मीडिया आणि सरकारने अतिरेकी दावे केले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की पाकिस्तानी सैन्याने भारताच्या आदमपूर एअरबेसवर हल्ला केला होता. सुखोई एसयू-30 एमकेआय विमानाचे नुकसान झाले होते आणि त्याचे काही उपग्रह छायाचित्रे देखील शेअर करण्यात आली होती. आता या बनावट छायाचित्रांमागील सत्य उघड झाले आहे आणि शेजारी देश त्याच्या खोट्या गोष्टींमुळे जगभरात लाजिरवाणा झाला आहे.
New report alleges a direct hit at India's Adampur Air Base by Pakistan damaged a Su-30, however a review reveals this image taken in March 2025, pre-conflict actually shows a MiG-29 undergoing maintenance, the dark soot near the engine test pad is routine, not battle damage pic.twitter.com/GOC1NVRX9I
— Damien Symon (@detresfa_) June 8, 2025
जुने छायाचित्र शेअर करून खोटेपणा पसरवला गेला
डेमियन सायमन यांनी एका पोस्ट आणि त्यात केलेल्या फोटो द्वारे पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले आहेत. पाकिस्तानने आदमपूर एअरबेसचे नुकसान केल्याचा दावा केलेला फोटो ऑपरेशन सिंदूरच्या दोन महिने आधीचा आहे.
प्रत्यक्षात, मार्च 2025 मध्ये घेतलेला एक उपग्रह फोटो पाकिस्तानी मीडिया आणि सरकारने शेअर केला होता. त्यात मिग-29 चे देखभालीचे काम सुरू होते. शाहबाज शरीफ ज्या नुकसानीचा दावा करत होते. ते इंजिन टेस्ट पॅडजवळ दिसणारा काळी काजळी आहे. विमानांच्या देखभालीदरम्यान हे सामान्य आहे.
दरम्यान, भारताने आदमपूर एअरबेसवरील पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश आधीच केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी तेथे भेट दिली आणि लष्करी सैन्यासोबत वेळ घालवला. यापूर्वीही पाकिस्तानने दावा केला होता की, ऑपरेशन सिंदूरमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. तथापि, नंतर शाहबाज शरीफ सरकारने सर्व प्रांतांना नुकसानीचा तपशीलवार अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले होते, यावरुन त्यांचे किती नुकसान झाले असेल हे सिद्ध होते.












Click it and Unblock the Notifications