जगभरात इस्लामचा रक्षक असा आव आणणाऱ्या पाकड्यांचा 'धार्मिक ढोंगीपणा' उघड; 40 मशिदी उद्धवस्त!

Pakistan military atrocities : जगभरात इस्लामचा रक्षक आणि मानवाधिकारांचा कैवारी असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. बलुचिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलुचिस्तान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला असून, लष्कराने आतापर्यंत 40 हून अधिक मशिदी टँक आणि तोफखान्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Pakistan military atrocities

धार्मिक स्थळांवर थेट हल्ले आणि कुराणचा अवमान

मीर यार बलुचिस्तान यांच्या मते, पाकिस्तानी लष्कराने केवळ मशिदींवर बॉम्बफेक केली नाही, तर अत्यंत संतापजनक कृत्यं केली आहेत. लष्करी कारवाईच्या नावाखाली ४० हून अधिक मशिदींना टँकनी लक्ष्य करण्यात आले. सुरक्षा दलांनी मशिदींमधील पवित्र कुराण जाळल्याचे आणि धार्मिक स्थळांची विटंबना केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक धार्मिक विद्वानांचे (इमाम) लष्कराने अपहरण केले असून त्यांचा अद्याप कोणताही पत्ता नाही. "हे हल्ले केवळ वास्तूवर नसून बलुच समुदायाच्या धार्मिक श्रद्धेवर केलेला मानसिक हल्ला आहे, जेणेकरून त्यांनी स्वातंत्र्याची मागणी सोडावी," असे मीर यार बलुचिस्तान यांनी स्पष्ट केले.

ऐतिहासिक 'कलाटची मशीद': अत्याचाराचा जिवंत पुरावा

पाकिस्तानी सैन्याच्या क्रूरतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कलाटच्या खानची ऐतिहासिक मशीद. ही मशीद पाकिस्तानी टँकनी लक्ष्य केलेले पहिले प्रमुख धार्मिक स्थळ होते. आजही या मशिदीच्या भिंतींवर मोर्टार शेल आणि गोळ्यांचे निशाण स्पष्ट दिसतात. ही ऐतिहासिक वास्तू पाकिस्तानच्या इस्लामिक मूल्यांच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते.

पाकिस्तान: एक 'दहशतवादी देश' आणि दुटप्पी धोरण

सोशल मीडियावर पाकिस्तानचा निषेध करताना मीर बलुच यांनी पाकिस्तानला "दहशतवादी देश" म्हणून संबोधले आहे. त्यांचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून हिंदू, शीख आणि ख्रिश्चन समुदायांना लक्ष्य केले जात आहे. काश्मीर आणि बलुचिस्तानमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेचे बलुच नेत्यांनी स्वागत केले आहे. स्वतःच्या देशात मुस्लिमांवर अत्याचार करणारा पाकिस्तान भारताला धार्मिक स्वातंत्र्याचा उपदेश कसा देऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मे २०२५ नंतर संघर्षाला धार

मे २०२५ मध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा झाल्यापासून या प्रांतात तीव्र संघर्ष सुरू आहे.

  • नैसर्गिक संसाधनांची लूट : बलुचिस्तान खनिज संपत्तीने समृद्ध आहे, मात्र इस्लामाबाद आणि चीन मिळून या संसाधनांची लूट करत असल्याचा आरोप बलुच जनतेचा आहे.
  • निर्णायक लढाई : पूर्वी हा संघर्ष केवळ स्वायत्ततेसाठी होता, मात्र आता तो पूर्ण स्वातंत्र्यासाठीच्या निर्णायक युद्धात रूपांतरित झाला आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+