यांच डोकं फिरलंय का!, पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्याच देशावर का केला हवाई हल्ला, ३० निरपराधांचा बळी!
pakistan army airstrike own citizens : पाकिस्तानमध्ये शांतता आणि स्थिरता कायम असल्याचे दावे कायम केले जातात, परंतु, अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पाकिस्तानी हवाई दलाच्या वतीने एक भयानक कृत्य करण्यात आले आहे. दुश्मनांवर हल्ला करण्यासाठी असलेले हवाई दल मात्र, पाकिस्तानसाठीच कर्दनकाळ ठरू लागले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पाकिस्तान हवाई दलाने स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यांच काय डोकं फिरलंय काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यात झालेल्या या भीषण हल्ल्यात 30 हून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि 20 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

नेमके काय घडले?
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, पाकिस्तानी हवाई दलाच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हल्ला केला.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात किमान ८ बॉम्ब टाकण्यात आले. यामुळे गावातील पाच घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि परिसराचे मोठे नुकसान झाले.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बॉम्बस्फोटांचा आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण परिसर हादरला. सर्वत्र मृतदेह विखुरलेले होते आणि जखमींचा आक्रोश ऐकू येत होता.
विध्वंसाचे भयावह चित्र
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यानंतर गावाचे चित्र अत्यंत भयावह झालेले आहे. घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, रस्ते ढिगाऱ्यांनी भरले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये या विध्वंसाची भीषणता दिसून येते.
बचाव पथकांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यात प्रचंड अडचणी येऊ लागलेल्या आहेत. स्थानिक रहिवासी स्वतःहून बचाव कार्यात मदत करत आहेत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
पाकिस्तानी सरकार मौन का?
या गंभीर घटनेनंतरही पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या मौनामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्याच नागरिकांवर हा हल्ला का केला? या हल्ल्यामागे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत.
या घटनेमुळे पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा आणि मानवी हक्कांबद्दलची स्थिती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील शांततेच्या दाव्यांवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.












Click it and Unblock the Notifications