Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय विमाने घाबरुन माघारी गेली, पाकिस्तानचा दावा; पहाटे 2 ला रंगला थरार, युद्धाला सुरुवात झाली?

पाकिस्तानच्या हवाई दलाने गुरुवारी पहाटे भारतीय हवाई दलाची विमाने परत पाठविल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजता पाकिस्तानला युद्धाचा इशारा मिळाल्यानंतर हे घडल्याचे काही पाकिस्तानी वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. काही वृत्तानुसार भिंबर व कोटली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घिरट्या घालणारे दोन भारतीय क्वाडकाँप्टर पाडल्याचा दावाही करण्यात आला आहे. पाकिस्तानचा हा दावा खरा की खोटा, याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून काहीच अपडेट देण्यात आलेली नाही.

India-Pakistan war begins

नेमके काय घडले?

भारतीय लष्कर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती पाकिस्तानी सैन्याला बुधवारी समजली. भारत येत्या २४ ते ३६ तासांत हल्ला करेल, ही बातमी पाकिस्तानमध्ये वादळासारखी पसरली. त्यानंतर गुरुवारी पहाटे दोन वाजता भारतीय हवाई दलाच्या चार राफेल लढाऊ विमानांना पाकिस्तानने परत पाठवले, असा दावा पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी केला. काही वृत्तांमध्ये पाकिस्तानच्या भिंबर व कोटली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घिरट्या घालणारे दोन भारतीय क्वाडकाँप्टर पाडण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.

काय म्हणते पाकिस्तान?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्याची प्रतिज्ञा केली. पीटीव्ही न्यूजने नियंत्रण रेषेवर शोध मोहिमेदरम्यान अनेक आयएएफ राफेल आणि एसयू-३० एमकेआय पाहिल्याचा दावा करण्यात आला. त्यांचा पाकिस्तानी सैन्याने पाठलाग केल्याचे वृत्त काही पाकिस्तानी न्यूज चॅनलने दिले.

पाकच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, असे विधान केले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीला परवानगी देण्यास भारताचा नकार त्याचा हेतू प्रकट करतो," असे तरार म्हणाले होते. दिल्लीवर तणाव वाढवण्याचा आरोप करत तरार म्हणाले की, भारतातील पहलगाम हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नव्हता.

इम्रान खान काय म्हणतात?

तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या पक्षाच्या तहरीक-ए-इन्साफच्या एक्स अकाउंटद्वारे एक पोस्ट केली. त्यात म्हटले आहे की, भारताने या अणुयुद्धाच्या वेळी बेपर्वा कृती टाळल्या पाहिजेत . शांतता ही कमकुवतपणा नाही. माजी भारतीय लष्करी अधिकारी आणि रणनीतिकार लेफ्टनंट जनरल डीएस हुडा म्हणाले की, "या तणावपूर्ण वातावरणातील चुकांमुळे असा संघर्ष निर्माण होऊ शकतो जो कोणताही पक्ष रोखू शकत नाही". दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला मोकळीक दिल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव जास्त वाढला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+