..म्हणे राफेल पाडले! पाकिस्तानचा फेक दावा; 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानची हवा टाईट, आता धडपड सुरु
operation sindoor update : पाकिस्तानात हवाई हल्ला करुन दहशतवाद्यांची तळं नष्ट करत भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा सुरु झाला असून काही फेक दावेही पाकिस्तानकडून करण्यात आले आहे.
रात्रीच्या अंधारात, जेव्हा संपूर्ण जग झोपले होते, तेव्हा भारतीय जवान डोळ्यात तेल घालून होते. त्यांनी पाकिस्तानी भूमीवर कहर केला, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. हा सामान्य सर्जिकल स्ट्राईक नव्हता. शत्रूला धडा शिकवण्याची ही पहिली सुरुवात आहे आणि इशाराही आहे.

जैश अन् लष्कर ए तोयबाला धक्का
पाकिस्तानात केलेल्या कारवाईचा पहिला धक्का पीओकेमध्ये उपस्थित असलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कला बसला, जे नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचे स्वप्न पाहत होते. भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवरून विशेष दलांनी जे केले ते पाकिस्तानला 1971 च्या जखमांची आठवण करून देत होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी पुरती गांगरली.
पाकिस्तानात आपत्कालीन उपाययोजना
- भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असून तेथे अनेक सुरक्षेचे उपाय करण्यात आले आहेत.
- भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि लाहोरमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
- सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- नागरी संरक्षण आणि इतर संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे.
इस्लामाबाद विमानतळांवर रेड अलर्ट
पाकिस्तानने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेड अलर्ट जारी केला आहे आणि सर्व व्यावसायिक उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. याशिवाय कराची, लाहोर, मुलतान, फैसलाबाद, स्कार्दू आणि पेशावर येथील विमानतळांनाही हाय अलर्ट आहे.
ऑपरेशन सिंधुरनंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया काय आहे?
पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यांना 'युद्धाची कृती' म्हटले आहे आणि कडक प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील दोन भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा आणि भारतीय ब्रिगेड मुख्यालय आणि एक चेकपोस्ट उद्ध्वस्त केल्याचा फेक दावा केला आहे.
पाकिस्तानने जारी केलेला फोटो 2024 चा..
मुळात: पाकिस्तानचे दावे खोटे असल्याचे दिसून येते, कारण राफेल पाडल्याचे पाकिस्तानने शेअर केलेले फोटो 3 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमध्ये कोसळलेल्या भारतीय हवाई दलाच्या मिग-29 लढाऊ विमानाचे आहेत. आतापर्यंत भारतीय हल्ल्यांमध्ये 8 नागरिक ठार आणि 35 जखमी झाले आहेत. याशिवाय 2 जण बेपत्ता आहेत. भारताने 6 वेगवेगळ्या भागात एकूण 24 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.












Click it and Unblock the Notifications