Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान! पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रावर 'सायबर' हल्ले; 8 दिवसांत 10 लाख घटना; पाकिस्तान कनेक्शन काय

जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांत महाराष्ट्रातील पर्यटकही होते. आता या हल्ल्यानंतर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. हा हल्ला झाल्यानंतर ऑनलाईन हल्ल्यांच्या घटनांतही वाढ झाली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने पाकिस्तानसह विविध देशांतील हॅकिंग गटावर सायबर फसवणुकीचे १० लाखांहून अधिक गुन्हे नोंदवले आहेत.

1 million cyber attacks in Maharashtra

सायबर युद्ध होणार का?

पाकिस्तान समोरासमोर हल्ला करु शकत नसल्याने असे भ्याड हल्ले करत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव म्हणाले की, भारतीय वेबसाइट्स आणि पोर्टल्सना लक्ष्य करणारे हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून करण्यात आले. ते म्हणाले की अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केला आहे. हे सायबर युद्ध असू शकतं, अशी शक्यताही त्यांनी व्यक केली.

१० लाखांहून अधिक घटना

पहलगाम हल्ल्यानंतर ऑनलाइन हल्ल्यांच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. भारतावर १० लाखांहून अधिक ऑनलाइन हल्ले झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरने पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गटांकडून भारतीय सिस्टमवर सायबर फसवणुकीचे १० लाखांहून अधिक गुन्हे नोंदवले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलिसांची सायबर गुन्हे अन्वेषण संस्था याचा तपास करत आहे.

महाराष्ट्र सायबर विभाग दक्ष

या संशयित सायबर युद्धाबाबत महाराष्ट्र सायबर सेल दक्ष झाला आहे. महाराष्ट्र सायबरने यापैकी अनेक हल्ले उधळून लावले असल्याचे सांगितले जात आहे. नोडल कार्यालयाने सर्व सरकारी विभागांसाठी एक सल्लागार तयार केला आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांचे सायबर पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सांगिण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सेल यामुळे अधिक दक्ष झाल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+