कुत्र्याचं शेपूट... आपण सामान पाठवतो आणि ते अतिरेकी; भारत-पाकमध्ये कशा-कशाचा होतो व्यापार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या दोन्ही देशांत १९४७ नंतर अनेकदा रक्तपातही झाले आहेत. पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. काश्मिरचा मुद्दाही पाकिस्तानने अनेकदा रक्तरंजीत केला आहे. यानंतर खरा प्रश्न पडतो, तो भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापाराचा... भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कोणता व्यापार होतो? कसा होतो? याच प्रश्नाची उत्तरे आपण शोधूयात...

India-Pakistan trade

दोन्ही देशांत होतो व्यापार

आजही भारत दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा माल पाकिस्तानला पाठवतो. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून वस्तूंची आयात लक्षणीयरीत्या कमी झाली. याचा अर्थ असा की भारत पाकिस्तानला निर्यात करत आहे. त्यांच्याकडून खूपच कमी वस्तू घेत आहे. २०२० च्या तुलनेत २०२४ पर्यंत भारताची निर्यात ३०० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तू जातात?

भारतातून पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या प्रमुख उत्पादनांमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी उत्पादने, साखर आणि मिठाई यांचा समावेश आहे. त्या बदल्यात पाकिस्तान भारताला कपडे, मीठ, सल्फर, चुना आणि सिमेंट पाठवतो. काही खनिजे पाकिस्तानमधून भारतात पाठवली जातात. तथापि भारताने २०१९ पासून सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर २०० टक्के शुल्क लादले आहे, जे अद्याप हटवलेले नाही. याशिवाय काही मसाल्याचे पदार्थही पाकिस्तानमधून भारतात येतात.

किती होतो व्यापार?

सर्व तणाव आणि निषेध असूनही २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार ५ वर्षातील सर्वोच्च पातळीवर राहिला. या काळात द्विपक्षीय व्यापार १.२१ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. पुलवामा हल्ल्यापूर्वी २०१८ मध्ये या दोन्ही देशांमधील व्यापार विक्रमी २.३५ अब्ज डॉलर्स झाला होता. संयुक्त राष्ट्रांच्या कोट्रेडच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात जवळजवळ थांबवली. परंतु २०२४ मध्ये ती २०२३ च्या तुलनेत १२७ टक्क्यांनी वाढून १.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

आयातीवर लागू केला कर

२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात जवळजवळ थांबवली. सर्व वस्तूंवर २०० टक्के कर लादला. याशिवाय पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा (MFN) दर्जाही काढून घेण्यात आला. या निर्णयामुळे पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात २०१९ मध्ये ५४७ दशलक्ष डॉलर्सवरून २०२४ मध्ये फक्त ४.८ दशलक्ष डॉलर्सवर आली. भारताची निर्यात १.२१ अब्ज डॉलर्सवर राहिली. ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा भारताने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले तेव्हा पाकिस्ताननेही द्विपक्षीय चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला. तथापि देशात महागाई वाढल्यानंतर पाकिस्तानने या निर्णयापासून माघार घेतली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+