ऑपरेशन सिंदूरने अडचणीत आलेले पाकिस्तान PM शरीफ यांची शांततेसाठी याचना, पण घातली एक अट!
India Pakistan, Operation Sindoor : दहशतवादाविरुद्ध भारताच्या मोठ्या लष्करी कारवाईने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाई तळ आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता पाकिस्तान पीएम यांनी हात जोडून भारत सरकारसोबत शांततेसाठी संवाद साधण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या त्याच वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततासंबंधी चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, त्यांनी एक अट घातली आहे की ही शांतता चर्चा काश्मीरच्या मुद्द्यावर असावी.

कामरा एअरबेसवर पाकिस्तानी हवाई दलाच्या वैमानिक आणि सैनिकांशी बोलताना, पाकिस्तानी लष्कराला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान शांततेसाठी बोलण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी काही अटी आहेत. त्यांनी काश्मीरवर भारताशी चर्चा करण्याची मागणी केली.
भारताने म्हटले आहे की, फक्त दहशतवादावरच चर्चा केली जाईल, तर भारताने आधीच स्पष्ट केले आहे की जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अजिंक्य भाग आहेत आणि राहतील. सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा सांगितले की, भविष्यात जर पाकिस्तानशी काही चर्चा झाली तर ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) वरच चर्चा होईल अन्यथा कोणतीही चर्चा होणार नाही.
पाक एक दिवस स्वतःला संपवेल : पंतप्रधान मोदी
जर पाकिस्तानने दहशतवादाला सातत्याने पाठिंबा देण्याचे काम सुरूच ठेवले तर ते एक दिवस स्वतःला नष्ट करतील, असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला. ते म्हणाले, ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्य आणि सरकार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे पाकिस्तानचा नाश होईल. जर पाकिस्तानला टिकून राहायचे असेल तर त्याला त्याचे दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त कराव्या लागतील. शांतीचा दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचे शक्तीप्रदर्शन
७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे सीमा ओलांडल्याशिवाय पाकिस्तानमध्ये असलेले ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईने जगासमोर भारताच्या संरक्षण क्षमतेची श्रेष्ठता दाखवून दिली.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला खूप नुकसान झाले आहे, परंतु ते जगभरात खोटे पसरवणे थांबवत नाहीये. भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आणि त्यांची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचाही समावेश होता. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार त्यांच्या संसदेत हवाई दलाचे खोटे कौतुक करताना दिसून आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. त्यांनी 6 आणि 7 मे रोजी दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. यानंतर, 8 आणि 9 मे रोजी 3 विमाने पाडण्यात आली. भारताने पाकिस्तानचे 2 जेएफ 17, 1 मिराज जेट, 1 अवाक आणि 1 सी-130 पाडले, पण, पाकिस्तान जगभरात़ खोटे पसरविण्याचे काम करत आहे.












Click it and Unblock the Notifications