Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डोनाल्ड ट्रम्पंचा भारताला आणखी एक मोठा धक्का! अमेरिकन पथकाने 'हा' घेतला निर्णय, मोठे संकट..

India us trade dispute : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफच्या निर्णयाचे परिणाम दिसून येत आहेत. भारतावर ५० टक्के कर लादल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचे तीन तेरा वाजण्याचे चिन्हे आहेत. त्यातच ट्रम्प - पुतीन चर्चेआधी मोठी घडामोड घडली असून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक निर्णय घेत भारताला धक्का दिला आहे.

India us trade dispute

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा करत फेब्रुवारीत व्यापार विषयक करारासंदर्भात वाटाघाटी सुरु केल्या होत्या. त्यानंतर भारत आणि अमेरिकेत व्यापारविषयक चर्चेच्या पाच फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. पण भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरीफवरुन झालेल्या संघर्षानंतर आता एक मोठी घडामोड घडली आहे. विशेष बाब म्हणजे रशिया आणि अमेरिका या राष्ट्रांच्या प्रमुखांच्या चर्चेपुर्वी ही घडामोड घडली आहे.

Take a Poll

अमेरिकेने घेतला हा निर्णय

इंडियन एक्स्प्रेसने सुत्रांच्या हवाल्यानुसार वृत्त दिले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारविषयक चर्चेची सहावी फेरी तूर्त थांबवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीच भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चेची सहावी फेरी आयोजित केली होती, पण आता वॉशिंग्टन डिसीच्या अधिकाऱ्यांचा भारत दौरा अमेरिकने थांबवला आहे.

दूध अन् कृषी क्षेत्रावर अडले घोडे

वनइंडियाने भारत-अमेरिका चर्चेतील सर्वात मोठी समस्या कृषी क्षेत्राची आहे. कारण अमेरिकेची अशी इच्छा आहे की, भारताने शेती आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ अधिक खुली करावी, परंतु भारताने यावर कडक भूमिका घेतली आहे. भारतातील दूध उत्पादक,शेतकरी लहान आणि सीमांत शेतकरी आणि पशुपालकांच्या हितांना धक्का पोहोचू शकतो आणि तो पोहचू द्यायचा नाही हे भारताने निश्चित केलेले आहे. हे घटक प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात म्हटले आहे.

शेतकरी, पशुपालक हे प्राधान्य आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला की, व्यापारासंदर्भात कुणी विपरीत धोरण अवलंबवत असेल तर त्यांना वगळून व्यापार करुया. दरम्यान, अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर ५०% आयात शुल्क लादून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु भारताने स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

२०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार

भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार नवीन उंचीवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रस्तावित व्यापार कराराचा (BTA) पहिला टप्पा २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या, दोन्ही देशांमधील व्यापार १९१ अब्ज डॉलर्सचा आहे आणि २०३० पर्यंत तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जात आहे. या करारामुळे केवळ व्यापार संबंध मजबूत होणार नाहीत तर गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+