मोठी बातमी! 48 तासांतच पाकिस्तान हतबल; जागतिक बँकेकडे पसरले हात, मागितली कर्जाची भीक!
India Pakistan War Pakistan government seeks loan from World Bank : पाकिस्तानी हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानची महत्वाच्या शहरावर जोरदार हल्ले केले. यानंतर पाकिस्तान आता संकटाच्या खाईत सापडला आहे. पाकिस्तानवर आर्थिक संकट घोंगावत असून त्यांनी विश्वबँकेकडे हात पसरले आहेत.

यासंदर्भात एनआयने त्यांच्या वृत्तात पाकिस्तानी सरकारने एक्सवरील पोस्ट सामाईक केली आहे आणि जागतिक बँकैकडे कर्जाची मदत मागितल्याची माहिती दिली आहे. यावरुन पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती चिंताजनक आहे हेही स्पष्ट होते.
आर्थिक मामलों के मंत्रालय, आर्थिक मामलों के प्रभाग - पाकिस्तान सरकार के आधिकारिक अकाउंट ने एक ट्वीट पोस्ट किया,"पाकिस्तान सरकार ने दुश्मन द्वारा किए गए भारी नुकसान के बाद अंतर्राष्ट्रीय साझेदारों से अधिक ऋण की अपील की है। बढ़ते युद्ध और स्टॉक में गिरावट के बीच, हम अंतर्राष्ट्रीय… pic.twitter.com/03VPPCO5pj
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2025
आंतरराष्ट्रीय भागिदारांकडे काय आहे पाकिस्तानची मागणी?
एनआयच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अधिकृत खात्याने एक ट्विट पोस्ट केले आणि त्यात म्हटले की, "शत्रूने केलेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. वाढत्या शत्रुत्वाच्या आणि घसरत्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो." असा या ट्विटचा मजकूर आहे.
भारत-पाकिस्तान तणावावर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काय म्हणाले?
भारत-पाकिस्तान तनाव पर चीनी विदेश मंत्रालय के प्रवक्ता लिन जियान ने कल कहा, "हमने भारत और पाकिस्तान के बीच चल रही स्थिति पर कल चीन की स्थिति साझा की है। चीन मौजूदा घटनाक्रमों से चिंतित है। भारत और पाकिस्तान एक दूसरे के पड़ोसी हैं और हमेशा रहेंगे। वे दोनों चीन के पड़ोसी भी हैं।… pic.twitter.com/iGHCvX9slm
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावावर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल सांगितले की, "आम्ही काल भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चीनची भूमिका सामायिक केली. चीन सध्याच्या घडामोडींबद्दल चिंतेत आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते दोन्ही चीनचे शेजारी देखील आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो."
"आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक हितासाठी कृती करण्याचे, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरसह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे, शांतता राखण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवू शकतील अशा कृती करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करतो. सध्याचा तणाव कमी करण्यासाठी आम्ही उर्वरित आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास तयार आहोत."
चीनचे एक पाऊल मागे..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात नेहमीच पाकिस्तानची बाजू घेत त्यांना मदतही करणाऱ्या चीनने आता हात आखडते घेतल्याचे काहीसे चित्र आहे. कारण चीनचे उच्चपदस्त अधिकारी आणि सरकार भारत पाकिस्तान संघर्षावर उघडपणे पाकिस्तानला सहकार्य करत नसल्याचे दिसून आले आहे. यासह पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादावर आताच चीनचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. आपला दहशतवादाला विरोध असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला सहकार्य करण्यात चीनने एक पाऊल मागे घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications