Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांचा इशारा-इराणसोबत व्यापार कराल तर 25% अतिरिक्त टॅरिफ; भारतावर कसा होणार परिणाम?

Donald Trump Vs India-Iran Trade at Risk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा 'टॅरिफ युद्धा'ला सुरुवात केली आहे. वेनेझुएलावरील कारवाईनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा इराणकडे वळवला आहे.

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलने सुरू असतानाच, ट्रम्प यांनी एक मोठा इशारा दिला आहे: "जो देश इराणसोबत व्यापार करेल, त्याला अमेरिकेत निर्यात करताना २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ भरावा लागेल."

या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीन आणि ब्राझीलला बसणार असला, तरी भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे भारतावर पडणारा टॅरिफचा बोजा विक्रमी पातळीवर पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे.

India-Iran Trade at Risk

भारतावर टॅरिफचा 'तिहेरी' मारा?

ट्रम्प प्रशासनाच्या नवीन नियमांमुळे भारताची गणिते बिघडू शकतात. सध्याची स्थिती पाहिल्यास भारतावर खालीलप्रमाणे टॅरिफचा बोजा पडू शकतो:

सामान्य टॅरिफ: अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय मालावर आधीच २५% टॅरिफ आहे.

रशिया तेल टॅरिफ: रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५% टॅरिफ.

इराण व्यापार टॅरिफ: आता इराणसोबत व्यापार सुरू ठेवल्यास आणखी २५% टॅरिफ लागण्याची शक्यता आहे.

याचा अर्थ असा की, जर भारताने आपले धोरण बदलले नाही, तर अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर एकूण ७५ टक्क्यांपर्यंत टॅरिफचा डोंगर उभा राहू शकतो, ज्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात अत्यंत महाग होतील.

भारत आणि इराण: किती मोठा व्यापार?

तेहरानमधील भारतीय दूतावासानुसार, इराण हा भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दोन्ही देशांमधील एकूण व्यापार २.३३ अब्ज डॉलर इतका होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढला आहे.

भारताची निर्यात (१.६६ अब्ज डॉलर) : बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळे, औषधे, सॉफ्ट ड्रिंक्स, काजू आणि मांस.

भारताची आयात (६७२.१२ दशलक्ष डॉलर) : मेथनॉल, पेट्रोलियम बिटुमेन (रस्ते बनवण्याचे साहित्य), सफरचंद, LPG, खजूर आणि बदाम.

एप्रिल ते जुलै २०२३ दरम्यानही ६६० दशलक्ष डॉलरचा व्यापार झाला आहे. इराणला होणारी कृषी निर्यात भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

इराणमधील अंतर्गत संघर्ष आणि ट्रम्प यांची 'रेड लाईन'

इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या विरोधात तीव्र आंदोलने सुरू आहेत. आर्थिक संकटामुळे सुरू झालेली ही ठिणगी आता सत्तेच्या विरोधात वणवा बनली आहे. मानवाधिकार संघटने नुसार, या संघर्षात आतापर्यंत ५९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, "इराण निदर्शकांवर कारवाई करून 'रेड लाईन' ओलांडत आहे. अमेरिका आता कठोर पर्यायांचा विचार करत आहे."

इराणचा प्रतिहल्ला आणि आर्थिक रसातळ

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागर गालीबाफ यांनी इशारा दिला आहे की, "अमेरिकेने हल्ला केल्यास या भागातील सर्व अमेरिकन लष्करी तळ, जहाजे आणि इस्रायल आमच्या लक्ष्यावर असतील."

इराणची आर्थिक स्थिती भीषण!

चलन घसरण : डिसेंबर २०२५ मध्ये इराणी 'रियाल' इतिहासातील नीचांकी पातळीवर (१.४५ दशलक्ष प्रति डॉलर) पोहोचला.

महागाई: खाद्यपदार्थांच्या किमती ७२% आणि औषधे ५०% महागली आहेत.

कर वाढ : २०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने ६२% कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामुळे जनक्षोभ अधिक वाढला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+