LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा
Lpg gas e kyc : गेल्या काही दिवसांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या ई-केवायसीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यावर अधिकृत स्पष्टीकरण देऊन कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आधार आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी हे सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य नसून, केवळ ठराविक प्रकरणांमध्येच ते आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

नेमका नियम काय? कोणाला गरज आहे ई-केवायसीची?
- १. 'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ज्या ग्राहकांची ओळख आधीच पडताळली गेली आहे आणि ज्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची गरज नाही.
- २. उज्ज्वला योजना लाभार्थी: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र वर्षातून एकदा ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. सबसिडीचा (DBT) लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
- ३. पुरवठा खंडित होणार नाही: जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल, तरीही तुमच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- घरगुती: ₹९१३.००
- कमर्शियल: ₹१,८८४.५०
- घरगुती: ₹९१२.५०
- कमर्शियल: ₹१,८३६.००
- घरगुती: ₹९३९.००
- कमर्शियल: ₹१,९८८.५०
- घरगुती: ₹९२८.५०
- कमर्शियल: ₹२,०४३.५०
- हैदराबाद: ₹९६५.००
- कमर्शियल: ₹२,१०५.५०
- घरगुती: ₹९५०.५०
- कमर्शियल: ₹२,००७.००
- घरगुती: ₹९१५.५०
- कमर्शियल: ₹१,९५८.००
- घरगुती: ₹१,००२.५०
- कमर्शियल: ₹२,१३३.५०
घरबसल्या करा ई-केवायसी
ग्राहकांना आता गॅस एजन्सीच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून, गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲपद्वारे (उदा. IndianOil One, HP Pay किंवा Hello BPCL) विनामूल्य ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
सरकारचा उद्देश काय?
ई-केवायसीचा मुख्य उद्देश गॅस वितरणात पारदर्शकता आणणे हा आहे. याद्वारे बनावट गॅस कनेक्शन रोखणे, गॅसचा गैरवापर कमी करणे आणि केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच सबसिडी पोहोचवणे हे सरकारचे लक्ष्य आहे.
प्रमुख शहरांतील घरगुती, कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे आजचे दर
१. नवी दिल्ली
२. मुंबई
३. कोलकाता
४. चेन्नई
५. हैदराबाद
६. लखनऊ
७. बेंगलुरु
८. पटना












Click it and Unblock the Notifications