इराणवर अमेरिकेचा 'महाविनाशक' प्रहार! 2200 किलोच्या बंकर बस्टर बाँम्बनी मिसाईल्स तळ उद्ध्वस्त
US Iran war update : मध्यपूर्वेत (Middle East) युद्धाचा वणवा पेटला असून अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी हल्ला केला आहे. अमेरिकेने आपल्या अती-घातक २२०० किलो (५००० पाउंड) वजनाच्या 'बंकर बस्टर' बॉम्बचा वापर करून इराणच्या जमिनीखालील शेकडो फूट खोल असलेल्या मिसाईल तळांना राख केले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशांत खळबळ माजली असून तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार जगावर आहे.

जमीनीत गुप्त इराणचे तळ नष्ट
अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, ही 'सर्जिकल स्ट्राईक' इराणच्या त्या अँटी-शिप क्रूझ मिसाईल्सना नष्ट करण्यासाठी होती, ज्यांच्यामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांना मोठा धोका निर्माण झाला होता. इराणने जमिनीखाली अत्यंत सुरक्षित आणि अभेद्य बंकरमध्ये ही क्षेपणास्त्रे लपवून ठेवली होती, मात्र अमेरिकेच्या महाकाय बंकर बस्टर बॉम्बनी हे कवच भेदून तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
नाटो (NATO) देशांवर ट्रम्प यांचा संताप
हल्ल्यानंतर काही वेळातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांवर निशाणा साधला. ट्रम्प म्हणाले, "बहुतेक नाटो देश कागदावर आमच्यासोबत आहेत, पण प्रत्यक्ष रणांगणावर सैन्य किंवा संसाधने पाठवण्यास टाळाटाळ करत आहेत. मित्रराष्ट्रांची ही भूमिका धक्कादायक आहे." फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीने या युद्धात थेट सहभागी होण्यास आणि युद्धनौका पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला आणि इराणचा प्रत्याघात
केवळ अमेरिकाच नाही, तर इस्त्रायलनेही आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. इस्त्रायली हवाई दलाने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये भीषण बॉम्बफेक केली आहे. याला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या युएई (UAE) मधील तेल साठ्यांवर आणि दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ले केले आहेत. फुजैराह येथील तेल सुविधांवर झालेल्या बमबारीने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जगावर आर्थिक मंदीचे सावट (Global Energy Crisis)
जगातील २०% तेल पुरवठा करणारा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा मार्ग मार्चच्या सुरुवातीपासूनच बंद असल्याने कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इंधन टंचाईमुळे युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट उभे राहिले असून, जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर जग भीषण आर्थिक मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हेही वाचा : Iran vs usa war : इराण थेट अमेरिकेवर हल्ला करू शकतो का? हल्ला अन् मिसाईलची क्षमता किती? वाचा
हेही वाचा : पाकिस्तानचा काबूलमध्ये नरसंहार, 400 जणांच्या बळीनंतर भारत पाकवर संतापला! 'ही' केली मोठी मागणी












Click it and Unblock the Notifications