महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार?
अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. समाजात वावरताना आणि विशेषतः राजकारण-समाजकारणात सक्रिय असताना नेत्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे आणि आपल्या वागण्याचे जनतेवर काय परिणाम होतील, याचे भान ठेवले पाहिजे, असा सूचक इशारा भुजबळांनी यावेळी दिला.

संस्थेवरील सदस्यत्वाबाबत खुलासा
रूपाली चाकणकर या खरात याच्या संस्थेशी निगडित होत्या, यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, अनेकदा मोठे पद हाताशी असल्यावर संस्था आपल्याला मदतीसाठी किंवा पदाचा फायदा होईल या हेतूने नाव जोडतात. चाकणकर या पुण्याच्या आहेत, त्यांना कदाचित तिकडे कोणीतरी नेले असावे. मात्र, अशा प्रकरणांमुळे समाजकारण करणाऱ्या लोकांची प्रतिमा डागाळली जाते. मंदिरात जाणे, योग किंवा ध्यानधारणा करणे यात काही गैर नाही, पण भोंदूगिरीला खतपाणी मिळेल असे कृत्य टाळायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय कोणाचा?
चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर, आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उत्तर देताना भुजबळांनी स्पष्ट केले की, महिला आयोगाचे पद हे शासकीय असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय पूर्णपणे पक्षाच्या अखत्यारीत येतो. यावर पक्षश्रेष्ठी आणि सुनेत्रा पवार मिळून चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असे सांगत भुजबळांनी चेंडू पक्षनेतृत्वाच्या कोर्टात टोलवला आहे.
राजीनाम्यासाठी घाई नको
रूपाली चाकणकर यांचा राजीनामा तातडीने का घेतला गेला नाही, यावर स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले की, कोणत्याही आरोपाची सत्यता पडताळल्याशिवाय टोकाचे पाऊल उचलणे योग्य नसते. सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांना अनेक कामे असतात, त्यामुळे या प्रकरणातील तथ्य जाणून घेऊन आणि सविस्तर चर्चा करूनच पुढील पाऊल उचलले जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, तपासाअंती जे सत्य बाहेर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
-
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
मुंबईकरांनो पाणी भरून ठेवा! 24 तासांचा 'मेगा वॉटर कट'; 50 हून अधिक भागांत पाणीपुरवठा ठप्प, वाचा यादी -
IPL 2026 csk schedule वेळापत्रक जाहीर; संजू सॅमसन चेन्नईत सामील, पाहा संपूर्ण शेड्युल! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका







Click it and Unblock the Notifications