मोठी बातमी : भारताने कॅनडातून आपल्या राजदूताला परत बोलावले; पण का घेतला असा निर्णय, वाचा सविस्तर
कॅनडाच्या सरकारने भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना एका प्रकरणात संशयित म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने संजय कुमार वर्मा यांना थेट भारतात परत बोलावले आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदन जारी केले. त्यात म्हटले की,कॅनडा सरकार हे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना सुरक्षा पुरवण्याबाबत आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही त्यांना परत बोलावत आहोत. दुसरे म्हणजे कॅनडाकडून चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. ते आम्हाला मान्य नाहीत.
मुळात, रविवारी कॅनडा सरकारने भारताला एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये उच्चायुक्त आणि काही मुत्सद्दींचे वर्णन संशयास्पद असल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्याशी संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली नसली तरी त्यांचा संबंध निज्जरच्या हत्येशी जोडला जात आहे. यावर भारताने आज कॅनडातील भारतीय राजदूताला समन्स देऊन परत बोलावले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे आरोप राजकीय हेतूने केले जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारत सरकार हे बिनबुडाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत आहे. त्यामागील कारण ट्रुडो सरकारचा राजकीय अजेंडा असू शकतो. जो व्होट बँकेच्या राजकारणाने उद्देशीत आहे.
नेमका वाद कुठून सुरू झाला?
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर 2023 मध्ये काही आरोप केले होते. मात्र, कॅनडाच्या सरकारने अनेकदा विचारणा करूनही एकही पुरावा भारत सरकारला दिलेला नाही. हा नवा आरोपही अशाच पद्धतीने करण्यात आलेला आहे. ट्रूडो सरकार हे बऱ्याच काळापासून सातत्याने भारताच्या राजदूतांवर आरोप करत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात भारताविरुद्ध अतिरेकी आणि फुटीरतावादी अजेंड्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावा?
18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे शहरातील गुरुद्वारातून बाहेर पडताना निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी भारत सरकारवर निज्जर यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता, तो भारताने फेटाळला होता. यानंतर 3 मे रोजी निज्जर यांच्या हत्येतील तीन आरोपींना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपी भारतीय आहेत. कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले की, पोलिस अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. निज्जरला मारण्याचे काम भारताने त्यांच्यावर सोपवले होते, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर भारताने प्रत्युत्तर देत सांगितले होते की, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.












Click it and Unblock the Notifications