भारत-चीन सैन्याची पूर्व लडाखमधून माघार घेण्यास सुरुवात; 3 मुद्द्यांमध्ये वाचा IND-CHINA गस्त करार

भारत आणि चीनच्या सैन्याने शुक्रवारी (दि.25) ऑक्टोबरपासून पूर्व लडाख सीमेवरून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. ANI वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलेले आहे. तर 31 ऑक्टोबर रोजी दोन्ही देशातील सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालतील व एकमेकांना सूचित करतील.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही सैन्याने पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग पॉइंटमधील त्यांचे तात्पुरते तंबू आणि शेड हटवले आहेत. वाहने आणि लष्करी उपकरणेही त्या ठिकाणाहून हटवली जात आहेत.

India China Border Dispute

29 ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेतले जाईल

लष्कर सुत्रांच्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देश देपसांग आणि डेमचोकमधून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतील. 31 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही लष्कर वेगवेगळ्या दिवशी या दोन पॉइंटवर गस्त घालतील आणि एकमेकांना माहितीही देतील. गस्तीसाठी मर्यादित सैनिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तो सैन्याचा आकडा किती असेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

गॅल्वन व्हॅली, गोगरा हॉट स्प्रिंग्सबाबत अद्याप निर्णय

करारामध्ये लडाखमधील डेपसांग अंतर्गत 4 मुद्यांवर करार झाला आहे, परंतु गलवान व्हॅली आणि डेमचोकमधील गोगरा हॉट स्प्रिंग्समध्ये गस्त घालण्याबाबत काहीही सांगितले गेले नाही.

डेपसांग : भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, सैनिक आता गस्त घालण्यासाठी डेपसांगमधील गस्त बिंदू 10, 11, 11-A, 12 आणि 13 वर जाऊ शकतील.

डेमचोक: पेट्रोलिंग पॉईंट-14 म्हणजेच गलवान व्हॅली, गोगरा हॉट स्प्रिंग्स म्हणजेच PP-15 आणि PP-17 हे बफर झोन आहेत. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, येथे गस्त घालण्याबाबत नंतर विचार केला जाईल, असे म्हटले आहे. बफर झोन म्हणजे असे क्षेत्र जिथे दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येऊ शकत नाही. हे झोन विरोधी शक्तींना वेगळे करतात.

भारत-चीन गस्त करार वाचा 3 पॉईंट्स

1. पंतप्रधान मोदींच्या ब्रिक्स दौऱ्यापूर्वी कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. ब्रिक्समध्ये मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. सर्व परिस्थितीत शांतता राखणे आवश्यक आहे, असे मोदी येथे म्हणाले होते.

2. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) एप्रिल 2020 मध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास चीन आणि भारत सहमत झाले. याचा अर्थ आता चिनी सैन्याने ज्या भागात अतिक्रमण केले होते तेथून माघार घेणार आहे.

3. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिश्री म्हणाले होते की भारत आणि चीनच्या सीमावर्ती भागात गस्त घालून 2020 नंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दोन्ही देश यावर पावले उचलतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+