IGF आर्चर-अमिश पुरस्काराचा पहिला मानकरी लवकरच जाहीर होणार
इंडिया ग्लोबल फोरम (IGF) या आठवड्यात 'IGF Archer Amish Award for Storytellers' या प्रतिष्ठित पुरस्काराचा पहिला विजेता जाहीर करणार आहे. हा पुरस्कार IGF London 2024 मध्ये सुरू करण्यात आला असून, याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक जेफ्री आर्चर आणि अमिश त्रिपाठी यांची साथ लाभली आहे. House of Abhinandan Lodha या संस्थेने हा पुरस्कार प्रायोजित केला आहे.

या साहित्यिक पुरस्काराद्वारे समकालीन भारतीय काल्पनिक साहित्याचा गौरव करण्यात येतो, जे भारताच्या विविधतेचे, आकांक्षांचे आणि उर्जेचे प्रतिबिंब असते. हा पुरस्कार भारतातील कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून, सांस्कृतिक संवादाला चालना देतो आणि भारत-युके संबंधात अधिक सखोल समज निर्माण करतो.
25,000 डॉलर (अंदाजे ₹20 लाखांहून अधिक) इतकी भव्य पारितोषिक रक्कम असलेला हा पुरस्कार, जगातील सर्वात मोठ्या साहित्य पुरस्कारांपैकी एक मानला जात आहे. तो भारतीय साहित्यास जागतिक स्तरावर अधोरेखित करतो आणि आधुनिक भारताच्या गुंतागुंतीच्या आणि गतिशीलतेने भरलेल्या कथा लिहिणाऱ्या उत्कृष्ट भारतीय लेखकांचा गौरव करतो.
या भव्य पुरस्काराचे वितरण युनायटेड किंगडमच्या सांस्कृतिक, माध्यम व क्रीडा मंत्री लिसा नॅंडी Rt Hon Lisa Nandy MP यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत IGF चे चेअरमन मनोज लाडवा, तसेच लेखक जेफ्री आर्चर आणि अमिश त्रिपाठी उपस्थित असतील.
लिसा नॅंडी यांची उपस्थिती ही युकेच्या नव्या सांस्कृतिक धोरणाला आणि भारतासोबतच्या वाढत्या सर्जनशील भागीदारीला अधोरेखित करते, विशेषतः मुक्त व्यापार करार (FTA) नंतरचे परिप्रेक्ष्य लक्षात घेता.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये पुढील लेखकांचा समावेश आहे:
नित्या नीलकंठन - Navapashanam - The Quest for the Nine Magical Poisons या कादंबरीसाठी
योगेश पांडे - The Kill Switch या थरारक कादंबरीसाठी
डॉ. शालिनी मल्लिक - The Way Home या संवेदनशील कथेसाठी
या अभिनव उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना IGF चे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवा म्हणाले, "IGF Archer Amish Award हा पुरस्कार म्हणजे भारतीय कथा जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची आमची वचनबद्धता आहे. या कथा सांस्कृतिक संवादांना चालना देतात आणि युके-भारत संबंधांच्या निर्णायक टप्प्यावर परस्पर समज वाढवतात."
प्रसिद्ध ब्रिटिश लेखक लॉर्ड जेफ्री आर्चर यांचे म्हणणे आहे की, "पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ते एखाद्या लेखकाच्या अथक परिश्रमांची दखल घेतात. जे एखादी रचना लिहिताना दिवस-रात्र झटतो, त्याला असा पुरस्कार मिळाल्याने त्याचे श्रम वाया गेले नाहीत, हे समजते."
अमिश त्रिपाठी, या पुरस्काराचे सह-संकल्पक आणि प्रमुख परीक्षक, पुढे म्हणतात, "हा पुरस्कार म्हणजे केवळ उत्कृष्ट कथाकथनाला प्रोत्साहन देण्याचे साधन नाही, तर तो भारतीयांनी स्वतःच्या कथा स्वतःच्या दृष्टिकोनातून मांडाव्यात, यासाठीही आहे. भारताला जेव्हा पाश्चिमात्य दृष्टीकोनातून पाहिले जाते, तेव्हा ती एकच कथा, एकच चष्मा असतो - पण भारतीय भारताला वेगळ्या नजरेतून पाहतात."
हा पुरस्कार सोहळा 18 जून 2025 रोजी लंडनमधील प्रतिष्ठित क्वीन एलिझाबेथ II सेंटर येथे होणार असून, IGF London 2025 च्या कार्यक्रमाचा एक भाग असेल. हा क्षण युके आणि भारत यांच्यातील चालू सांस्कृतिक संवादाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचा मानला जात आहे.












Click it and Unblock the Notifications