Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युरोपियन युनियन दुतोंडी; पहलगाम हल्ल्यानंतर भारताला दिला शांतीचा धडा, जयशंकर यांनी कसे खडसावले!

EU kaja kallas Vs India foreign minister s jaishankar : एकीकडे, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी युरोपियन युनियन रशियाविरुद्ध सतत आक्रमक भूमिका घेत आहे. एवढेच नाही तर तो युक्रेनला शस्त्रे देऊन मदत करत आहे. तर दुसरीकडे युरोपियन युनियनने पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संदर्भातील वादावर दुटप्पी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानविरोधात भूमिका घेण्याऐवजी युरोपियन युनियनने दोन्ही देशाला विशेषत: भारताला शांतीचा धडा शिकवला आहे. या सर्व घडामोडीनंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दोन वर्षांपूर्वी युरोपियन युनियनला ज्या पद्धतीने खडसावले होते, त्यांना त्यांचा आरसा दाखवला होता, त्या विधानाची आता चर्चा होऊ लागली आहे.

kaja kallas vs S Jaishankar

भारत-पाकला केले संवादाचे आवाहन!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर युरोपने भारताला शांततेचा धडा दिला आहे. युरोपियन युनियनचे उपाध्यक्षा आणि परराष्ट्र व्यवहार संघाच्या उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांनी भारताला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. काल त्यांनी एस जयशंकर यांच्याशी संवाद साधला. तसेच पाकिस्तानचे प्रतिनिधी इशार दार यांच्याशी देखील संवाद साधला.

काजा कल्लास काय म्हणाल्या पोस्टमध्ये?

युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाच्या उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांनी नुकताच भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानी समकक्ष इशाक दार यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेसंदर्भात कल्लास यांनी सोशल मीडिया एक्सवर त्यांचे मत मांडले. 'भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव चिंताजनक आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी मी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवाद साधण्याचे आवाहन करते. तणाव वाढविण्याने काहीही फायदा होणार नाही. डॉ. जयशंकर आणि इशाक दार यांच्याशी संवाद साधतांना या सर्व गोष्टींवर चर्चा झाली.

जयशकंर यांनी युरोपला कसे खडसावले होते?

दरम्यान, युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी काजा कल्लास यांनी संवाद साधून भारताला संयमाने व शांततेने राहण्याचे आवाहन केले. परंतु, या विधानानंतर आता एस जयशंकर याचे दोन वर्षांपूर्वीचे भाषण चर्चेत आले आहे. जून -2022 मध्ये स्लोवाकिया या ठिकाणी झालेल्या परिषदेत जयशंकर म्हणाले होते की, ज्यावेळी युरोपियन युनियनने पाकिस्तानला जबाबदार धरले पाहिजे आणि दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, त्या वेळी ते भारताला शांतीचा संदेश देत आहे. परंतु युरोपने या मानसिकतेतून बाहेर पडावे की त्यांच्या समस्या संपूर्ण जगाच्या समस्या आहेत, परंतु जगाची समस्या ही युरोपची समस्या नाही, असे विधान करून जयशंकर यांनी युरोपियन युनियनचा कानउघाडणी केली होती.

साधारणत: दोन वर्षांपूर्वी युक्रेन युद्धात रशियाला विरोध करण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे प्रयत्न युरोपियन युनियनकडून करण्यात आले होते. परंतु त्या दबावाला भारत बळी पडला नाही. त्याला भारताने थेट नकार दिला होता. चीनसोबतची समस्या वाढल्यास युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेमुळे जागतिक पाठिंबा मिळवणे कठीण होऊ शकते, या युरोपच्या मताला एस जयशंकर यांनी कडाडून विरोध केला होता.

काही तज्ज्ञांनी युरोपियन युनियनला फटकारले!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्षलषकांनी आता युरोपियन युनियनच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. काही तज्ज्ञ म्हणाले की, ईयूचे हे विधान पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत तोलण्यासारखे आहे, तर जमिनीवरील वास्तव पूर्णपणे वेगळे आहे.

"खरं सांगायचं तर, बहुतेक भारतीयांना युरोपकडून पाकिस्तानच्या ऐतिहासिक रेकॉर्डमुळे फारशा अपेक्षा नाहीत, असे एका परराष्ट्र धोरण समालोचकाने ट्विट केले. युरोपियन युनियन हा पाकिस्तानचा दुसरा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे आणि या दोघांचे गेल्या अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+