Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-अमेरिका यांच्यातील कृषी व्यापाराला ब्रेक लागणार?, ट्रम्पांचा आडमुडेपणा, मोदींनी दिला थेट इशारा!

भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी, दोन्ही देशांमधील कृषी व्यापार मात्र वेगाने वाढत आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतील आकडेवारीनुसार, हा व्यापार विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात शुल्क लागू केल्यामुळे या वाढीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील कृषी व्यापार थांबेल का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कृषी व्यापाराला मिळाली गती!

जानेवारी ते जून २०२५ या काळात भारताने अमेरिकेतून १.६९ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने आयात केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४९.१% अधिक आहे. याच काळात, भारताची अमेरिकेला होणारी कृषी निर्यात २४.१% ने वाढून ३.४७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी दोन्ही देशांमधील कृषी व्यापाराची वाढती गती दर्शवते.

50 percentage tariff impact on india us agriculture trade 2025

अमेरिकेतून भारतात येणाऱ्या प्रमुख वस्तू!

भारताच्या आयातीत अमेरिकेतून येणाऱ्या बदाम आणि पिस्त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत यात ४२.८% ची वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त, इथेनॉल, सोयाबीन तेल आणि कापूस ही देखील प्रमुख आयात उत्पादने आहेत. अमेरिकेचा भारतावर इंधन म्हणून इथेनॉल आयात करण्याचा दबाव असला तरी, भारताने अद्याप ही मागणी स्वीकारलेली नाही.

त्याचप्रमाणे, भारताने अनुवांशिकरित्या सुधारित (GM) कॉर्न आणि सोयाबीनच्या आयातीस परवानगी दिलेली नाही. तरीही, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे त्याची आयात वाढली आहे.

Take a Poll

भारताची अमेरिकेला होणारी निर्यात

भारताची अमेरिकेला होणारी कृषी निर्यात अधिक वैविध्यपूर्ण आहे. गोठवलेली कोळंबी (सीफूड) ही भारताची सर्वात मोठी कृषी निर्यात वस्तू आहे. याशिवाय, मसाले, बासमती तांदूळ, प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या यांचाही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. २०२४ मध्ये भारताने अमेरिकेला २.४८ अब्ज डॉलर्सचे सीफूड निर्यात केले होते, ज्यामुळे भारत अमेरिकेचा तिसरा सर्वात मोठा सीफूड पुरवठादार बनला होता.

हे ही वाचा : ट्रम्प यांच्या 50% टॅरिफ धोरणाने भारतीय निर्यात क्षेत्रावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर!

५०% टॅरिफचा संभाव्य परिणाम

ट्रम्प यांनी आता भारतावर ५०% आयात शुल्क लादल्यामुळे या वाढत्या व्यापाराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. विशेषतः, ५०% करामुळे भारतीय सीफूड उत्पादने अमेरिकेच्या बाजारपेठेत खूप महाग होतील. यामुळे भारत चिली (१०% कर), इक्वेडोर (१५%) आणि इंडोनेशिया (१९%) यांसारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत मागे पडू शकतो. यामुळे भारताच्या सीफूड निर्यातीवर मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका; 25% अतिरिक्त कर लादला, आता एकूण कर 50% असणार!

भविष्यात नेमका कसा मार्ग होणार!

एकंदरीत, भारत आणि अमेरिका यांच्यातील कृषी व्यापार वेगाने वाढत असला, तरी ट्रम्प यांचे नवीन शुल्क धोरण आणि जीएम पिकांसारख्या धोरणात्मक मतभेदांमुळे या वाढीला खीळ बसू शकते. हा कृषी व्यापार शाश्वत ठेवण्यासाठी दोन्ही देशांना धोरणात्मक संतुलन राखणे आवश्यक आहे. जर हे वाद वेळीच सोडवले नाहीत, तर दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.

मोदींनी दिलाय थेट इशारा!

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (tariff) लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, "भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही. याची मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी ती मोजायला तयार आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+