मोठी बातमी ! "मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे", ट्रम्प यांच्या निर्णयावर मोदींचे स्पष्ट उत्तर

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (tariff) लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, "भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही. याची मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी ती मोजायला तयार आहे."

pm narendra modi on us tariff farmers interest

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली होती आणि काल रात्री त्यांनी ते वाढवून थेट ५० टक्के करण्याची घोषणा केली. यानंतर मोदींनी दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

व्यापार करारातील कोंडी

अमेरिकेने वारंवार सार्वजनिक मंचावरून भारताला शुल्क वाढवण्याची धमकी दिली असली तरी, भारताने सुरुवातीला थेट प्रतिक्रिया देणे टाळले. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार (trade deal) करण्यासाठी बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती, मात्र डेअरी आणि कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याच्या मागणीवर भारताने नकार दिल्याने हा करार होऊ शकला नाही. भारताने हे क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत खुले करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च

पंतप्रधान मोदी यांनी हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च आहे. भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. माझ्या देशातील मच्छीमार आणि पशुपालकांसाठी भारत पूर्णपणे तयार आहे."

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे यावर आमचे सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांची ताकद हीच देशाच्या प्रगतीचा आधार आहे," असेही त्यांनी अधोरेखित केले.

या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकण्यास तयार नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे धोरण कायम ठेवणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+