PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा
Epfo 3 0 update pf claim settlement in 3 days : पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता कात टाकली आहे. 'EPFO 3.0' या नवीन सुधारणांमुळे पीएफचे क्लेम सेटल करण्यासाठी लागणारा २० दिवसांचा कालावधी आता अवघ्या ३ दिवसांवर आला आहे. केंद्र सरकारने डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत पीएफ काढणे, पेन्शन मिळवणे आणि नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करणे या प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि स्वयंचलित केल्या आहेत.

EPFO 3.0 मधील महत्त्वाचे बदल आणि फायदे
१. अवघ्या ३ दिवसांत क्लेम सेटलमेंट
पूर्वी पीएफचे पैसे मिळवण्यासाठी २० दिवसांपर्यंत वाट पाहावी लागायची. आता ज्या खात्यांचे केवायसी (KYC) पूर्ण आहे, अशा पात्र प्रकरणांमध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑटोमेशनद्वारे फक्त ३ दिवसांत पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत.
२. ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफर
आता नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतून नवीन कंपनीत पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी कर्मचाऱ्याला किंवा मालकाला अर्ज करण्याची गरज उरणार नाही. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुमारे ७० लाखांहून अधिक ट्रान्सफर विनंत्या स्वयंचलितपणे पूर्ण झाल्या आहेत. यासाठी आता मालकाच्या मंजुरीचीही आवश्यकता नाही.
३. ७० लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी
१ जानेवारी २०२५ पासून सर्व क्षेत्रीय कार्यालये 'सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम' शी जोडली गेली आहेत. यामुळे ७० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना देशभरात कोठेही वेळेवर आणि विनाअडथळा पेन्शन मिळणे सुलभ झाले आहे.
४. ५ लाख रुपयांपर्यंतचे क्लेम ऑटो मोडवर
चालू आर्थिक वर्षात २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, EPFO ने ५ लाख रुपयांपर्यंतचे सुमारे ३.५२ कोटी क्लेम ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे सेटल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आगाऊ रक्कम (Advance) काढण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.
५. EPS-95 पेन्शनमध्ये वाढ होणार?
किमान १,००० रुपये मासिक पेन्शन वाढवण्याबाबत संसदेत चर्चा झाली. सरकारने स्पष्ट केले की, पेन्शन वाढीचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असून सामाजिक सुरक्षा सुधारणांच्या आराखड्यानुसार त्यावर निर्णय घेतला जाईल.












Click it and Unblock the Notifications