Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका; 25% अतिरिक्त कर लादला, आता एकूण कर 50% असणार!

Trump Imposes 50 % Tariff on India Over Russian Oil Trade : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील कार्यकारी आदेशावर त्यांनी बुधवारी स्वाक्षरी केली असून, हा आदेश २७ ऑगस्टपासून लागू होईल. यापूर्वी, ३० जुलै रोजीही त्यांनी २५% कर जाहीर केला होता, त्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर एकूण ५०% कर लादला गेला आहे.

Trump Imposes 50   Tariff on India

रशियन तेल खरेदी हे प्रमुख कारण!

ट्रम्प प्रशासनाने भारतावर ही कठोर कारवाई करण्यामागे रशियाकडून सातत्याने सुरू असलेली तेल खरेदी हे मुख्य कारण दिले आहे. कालच ट्रम्प यांनी म्हटले होते की, भारत रशियासोबत व्यापार करून युक्रेनविरोधातील रशियन युद्धयंत्रणेला आर्थिक मदत करत आहे. यामुळे अमेरिकेला कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

आजच्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, "भारत सरकार रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात करत आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त कर लागू होईल." हा कर २१ दिवसांनंतर लागू होणार आहे.

काही वस्तूंना दिलासा!

दरम्यान, काही विशिष्ट भारतीय वस्तूंना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये जारी केलेल्या एका आदेशात ज्या वस्तूंना सूट मिळाली होती, ती सवलत कायम राहणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने: सेमी-कंडक्टर, स्मार्टफोन आणि संगणक, औषधनिर्माण, ऑटोमोटिव्ह पार्ट्स, तांबे आणि इतर धातू,खनिजे या वस्तूंवर अतिरिक्त कर लागू होणार नाही, याचा अर्थ या उद्योगांना सध्या तरी मोठा फटका बसणार नाही.

भविष्यातील शक्यता!

या आदेशात भविष्यात गरज पडल्यास, राष्ट्रपती कर दर बदलू शकतात किंवा नवीन तरतुदी जोडू शकतात, असेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेचे भारतावरील आर्थिक धोरण अस्थिर राहण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि अमेरिकेसोबतच्या व्यापारी संबंधांवर काय परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या परिस्थितीवर भारत सरकार कशी प्रतिक्रिया देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार!

चीननंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत होता.

मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये, जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+