अकाऊंट बॅन केल्यानंतर बाबर आझमचा तिळपापड; पाकच्याच सैन्याला धो-धो धूतले, म्हणाला, दहशतवाद...
जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. त्यावर कडक पावले उचलत भारताने पाकिस्तानच्या युट्युब चॅनलवर बंदी घालली. पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही बंदी घालण्यात आली. त्यात पाकचे स्टार क्रिकेटर्स बाबर आजम, मोहम्मद रिजवान, शाहिद अफरीदी इत्यादींचा समावेश होता. भारताच्या या कृतीनंतर क्रिकेटर बाबर आझमने पाकिस्तानी सैन्याला चांगलंच सुनावलं. आपल्या घाणेरड्या राजकारणामुळे या त्रासाला समोर जावं लागतंय, अशी टिका त्यानं केली.

काय म्हटला बाबर आझम?
बाबर आझमच्या इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रिनशॉट काही मीडियांनी शेअर केला. त्यात म्हटले आहे की, 'एक क्रिकेटर म्हणून मी नेहमी भारतात खेळण्यासाठी उत्साहित असतो. मी मला ते स्वतःच दुसरं घर मानतो. पण ही खूप खेदजनक गोष्ट आहे की माझं इंस्टाग्राम अकाऊंट भारतात बॅन करण्यात आलंय. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की पहलगाम हल्ल्याशी क्रिकेटर्सचा काहीही संबंध नाही'.

सैन्यावरही काढला राग
बाबर आझमने पुढच्या पोस्टमध्ये पाकिस्तानी सैन्यालाही सुनावलं. त्यांनी लिहिले की, 'पाकिस्तान आर्मीच्या घाणेरड्या राजकारणामुळे हे होतंय हे सर्वच पाहतायत. मी नाव घेणार नाही, पण सर्वांना माहितीये की खरी शक्ती कोणाकडे आहे. आणि कोण दहशतवाद्यांना सपोर्ट करतंय. पाकिस्तानी सैन्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतंय. दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करा. पाकिस्तान जिंदाबाद'.
बॅन केल्यानंतर भडकला
बाबर आझम हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. इंस्टाग्रामवर त्याचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यात निम्म्यापेक्षा जास्त भारतीय आहेत. भारतात त्याच इंस्टाग्राम अकाउंट बॅन झाल्यामुळे त्याची इंस्टाग्रामवरील इंगेजमेंट कमी झाली. ज्यामुळे बाबर त्रासलेला दिसतोय. बाबर आझम क्रिकेटमध्ये सध्या चांगल्या फॉर्मात नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे खरंतर तो पाकिस्तानी सैन्यावर भडकला, असं सांगितलं जायंय.












Click it and Unblock the Notifications